Tuesday, October 14, 2025
Home मराठी ‘प्रदीप राव व माझ्या संसाराला…’, म्हणत मानसी नाईकने पतीसोबत शेअर केला रोमँटिक व्हिडिओ

‘प्रदीप राव व माझ्या संसाराला…’, म्हणत मानसी नाईकने पतीसोबत शेअर केला रोमँटिक व्हिडिओ

मराठी चित्रपटसृष्टीतील ‘आयटम गर्ल’ अशी जिची ओळख आहे ती म्हणजे सर्वांची लाडकी मानसी नाईक. मानसी नाईक ही मराठी चित्रपटसृष्टीतील अत्यंत ग्लॅमरस आणि हॉट अभिनेत्री आहे. तसेच सोशल मीडियावर देखील तिचा खूप वावर असतो. सोशल मीडियावर तिचे अनेक डान्स व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत असतात. तिचे चाहते देखील तिच्या या व्हिडिओला भरभरून पसंती देत असतात. अशातच सोशल मीडियावर मानसीचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला आहे.

मानसीने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये ती तिचा पती प्रदीप खरेरासोबत अत्यंत रोमँटिक अंदाजात दिसत आहे. ती साज शृंगार करून बसलेली दिसत आहे. तसेच तिचा पती तिच्या मांडीवर डोकं ठेवून बसलेला दिसत आहे. ती त्याच्या चेहऱ्यावर प्रेमाने हात फिरवताना दिसत आहे. त्यांच्या या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला ‘पिरतीचा गाव’ हे गाणे वाजत आहे.

हा व्हिडिओ शेअर करून तिने कॅप्शन दिले आहे की, “मोह नसावा पैशाचा, गर्व नसावा रूपाचा, प्रदीपबरोबर संसार करीन सुखाचा. नव्या नव्या संसाराला नाजूक गोड अनुभवही नवा, प्रदीप राव व माझ्या संसाराला तुमचा अखंड आशीर्वाद हवा.” त्यांचा हा रोमँटिक व्हिडिओ सर्वांना खूप आवडला आहे. तिचे चाहते या व्हिडिओवर कमेंट करून त्यांच्या जोडीचे कौतुक करत आहेत. (mansi naik share her romantic video with husbund)

मानसी नाईकने या वर्षाच्या सुरुवातीला जानेवारी महिन्यात तिचा बॉयफ्रेंड प्रदीप खरेरासोबत लग्न केले आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत होते. तिचा पती प्रदीप हा एक इंटरनॅशनल बॉक्सर आहे. तसेच तो एक अभिनेता आणि मॉडेल आहे.

मानसी नाईक ही मराठी चित्रपट सृष्टीतील एक आघाडीची अभिनेत्री आणि डान्सर आहे. तिने चित्रपटात आणि गाण्यावर डान्स केला आहे. तिने ‘जबरदस्त’, ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’, ‘टारगेट’, ‘कुटुंब’, ‘तीन बायका फजिती ऐका’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. तसेच ‘वाट बघतोय रिक्षावाला’, ‘बाई वाड्यावर या’, ‘असं वाजवा की’ यांसारख्या अनेक सुपरहिट गाण्यांवर डान्स केला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-आता होणार धमाल! प्रेक्षकांचे मनोरंजन करायला ‘या’ पाच मालिका सज्ज; लवकरच झी मराठीवर मारणार दणक्यात एंट्री

-अथिया शेट्टीच्या पोस्टवर अनुष्काने ‘त्या’ गोष्टीवर निशाणा साधत केली भन्नाट कमेंट

-शिवानी सोनारला वाढदिवसाच्या आधीच मिळाले ‘हे’ गिफ्ट, पाहून तुम्हीही कराल अभिनंदन

हे देखील वाचा