Tuesday, July 9, 2024

‘परमसुंदरी’ गाण्यावर सोनाली कुलकर्णीने फ्लॉंन्ट केला तिचा ग्लॅमरस लूक

सध्या सर्वत्र नवरात्री सण मोठ्या उत्साहाने साजरा होत आहेत. मुळात सण हे आपल्या माणसांना एकत्र आणण्यासाठी असतात. त्यात नवरात्र हा सण स्त्रियांचा आदर करण्यासाठी साजरा केला जातो. अनेक मराठी अभिनेत्री सोशल मीडियावर त्यांचे फोटो शेअर करून नवरात्रीच्या शुभेच्या देत आहेत. नवरात्रीमधील सर्वात आकर्षित गोष्ट म्हणजे रात्री देवीचे जागर करून गरबा आणि दांडिया हे खेळ खेळले जातात. या डान्ससाठी एक खास पोशाख देखील परिधान केला जातो. असेच मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने घागरा चोळी घालून एक व्हिडिओ शेअर केला आहे.

सोनालीने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचा हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने रंगीबेरंगी स्कर्ट आणि काळ्या रंगाची डीपनेक आणि बॅकलेस चोळी घातली आहे. यासोबत तिने तिचे सगळे केस मोकळे सोडले आहेत. या व्हिडिओमध्ये ती तिचा बोल्ड ड्रेस फ्लॉन्ट करताना दिसत आहे . या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला ‘परमसुंदरी’ हे गाणे लागले आहे. (Marahi acteess sonalee kulkarni share her video on social media)

तिचा हा व्हिडिओ तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. अनेकजण या व्हिडिओवर त्याच्या प्रतिक्रिया देत आहेत. अभिनेता सिद्धार्थ जाधवने “मॅडम” अशी कमेंट करून हार्ट ईमोजी पोस्ट केली आहे. तसेच बाकी अनेकजण या व्हिडिओवर कमेंट करत आहेत.

सोनालीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, सोनाली एक उत्कृष्ट अभिनेत्री आणि डान्सर देखील आहे. तिने अनेक चित्रपटात काम केले आहे. तिने तिच्या करिअरमध्ये ‘मितवा’, ‘नटरंग’, ‘हिरकणी’, ‘ग्रँड मस्ती’, ‘पोस्टर गर्ल’, ‘क्लासमेट’, ‘धुरळा’, ‘हंपी’, ‘शटर’, ‘अजिंठा’, ‘ती आणि ती’, ‘क्षणभर विश्रांती’, ‘मस्ती’, सिंघम रिटर्न्स’ यांसारख्या अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटात काम केले आहे. यासोबतच ती लवकरच ‘तमाशा लाईव्ह’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचा पोस्टर तिने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर शेअर केला होता.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

नादच खुळा! अमिताभ बच्चन यांच्यासोबत सावलीप्रमाणे राहणाऱ्या बॉडीगार्डला मिळतो ‘इतका’ पगार; आकडा तर वाचा…

अमिताभ नव्हे, तर ‘या’ नावाने आई मारायची हाक; रेखा यांना सोडण्यामागे होते ‘हे’ मोठ्ठे कारण

सलमान खानने बहीण अर्पिताला लग्नात दिलं होतं ‘हे’ महागडं गिफ्ट, किंमत ऐकून तर फिरतील तुमचे डोळे

हे देखील वाचा