दक्षिणात्य सुपरस्टार मोहनलाल (Mohanlal) यांचा ‘मरक्कर: द लायन ऑफ अरेबियन सी’ (Marakkar: Lion of the Arabian Sea) या चित्रपटाच्या प्रदर्शनाला एक दिवस पूर्ण झाला आहे. मल्याळम चित्रपटसृष्टीतील बहुप्रतिक्षित मल्टीस्टारर चित्रपटाला पहिल्याच दिवशी प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्याचा परिणाम चित्रपटाच्या व्यवसायावरही होताना दिसत आहे. मोहनलाल अभिनित आणि दिग्दर्शक प्रियदर्शनच्या या पीरियड ड्रामा चित्रपटात दक्षिण चित्रपट अभिनेत्री कीर्ती सुरेश (Keerthy Suresh) मुख्य भूमिकेत आहे. तर बॉलिवूड सुपरस्टार सुनील शेट्टीनेही (Suniel Shetty) या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली आहे.
आता असे वृत्त समोर येत आहे की, चित्रपटाला भारतातच नाही, तर परदेशातही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटाने यूएईमध्ये सर्वकालीन विक्रम केला आहे. इथे चित्रपटाने सर्वाधिक कमाई केली आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, चित्रपटाने पहिल्या दिवशी यूएई बॉक्स ऑफिसवर तब्बल २.९८ कोटींची कमाई केली आहे. एवढेच नाही, तर या चित्रपटाने मल्याळम चित्रपट ‘कुरूप’चा विक्रमही मोडला आहे. दलकीर सलमान अभिनित ‘कुरूप’ने पहिल्याच दिवशी यूएई मार्केटमधून २.४ कोटींचा व्यवसाय केला होता. यासह या चित्रपटाने ‘कुरूप’चा सर्वकालीन विक्रम मोडला आहे.
दुसरीकडे भारतीय बाजारातही या चित्रपटाने केरळमध्ये चांगली कमाई केली आहे. हा चित्रपट केरळमधील ६२५ चित्रपटगृहांमध्ये ३००० हून अधिक शोसह प्रदर्शित झाला आहे. जिथे चित्रपटाने जबरदस्त कामगिरी केली आहे. याशिवाय इतर राज्यांतही या चित्रपटाला निश्चितच संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. मोहनलाल यांचा हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड या ५ भारतीय भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. यासह, हे त्यांचे पहिले पॅन इंडिया प्रदर्शन ठरले आहे.
‘मरक्कर’ १०० कोटींच्या क्लबमध्ये सामील?
विशेष म्हणजे, चित्रपट निर्मात्यांनी प्रदर्शित होण्याआधीच चित्रपटाने १०० कोटी क्लबमध्ये प्रवेश केल्याचे जाहीर केले आहे. निर्मात्यांनी ट्वीटद्वारे ही माहिती दिली आहे. यामध्ये असा दावा करण्यात आला होता की, चित्रपटाने बंपर ऍडव्हान्स बुकिंगचे आकडे नोंदवले आहेत. यासह, आगाऊ बुकिंगचे आकडे पाहता हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच १०० कोटी क्लबमध्ये सामील झाला आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-जुही चावलाने सांगितले केकेआर सामना हरल्यानंतर काय करतो शाहरुख खान
-याहूवर सर्वाधिक सर्च केलेल्या कलाकारांच्या यादीत ‘हा’ अभिनेता ‘दबंग’ खानलाही देतोय टक्कर, पाहा यादी