Thursday, December 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

मराठमोळ्या श्रुती मराठेनं केला हटके फोटो शेअर; पाहून तुम्हीही म्हणाल, ‘काय भारी दिसतेय!’

मराठी टेलिव्हिजन आणि चित्रपटसृष्टीमध्ये अनेक सुंदर आणि बोल्ड अभिनेत्री आहेत, पण सध्या सोशल मीडियावर बोल्डनेसच्या बाबतीत एका अभिनेत्रीचे पारडे चांगलेच जड ठरत आहे. ती अभिनेत्री दुसरी- तिसरी कोणी नसून आपल्या सर्वांची राधा म्हणजेच श्रृती मराठे होय. श्रृतीने झी मराठीवरील ‘राधा ही बावरी’ या मालिकेत मुख्य भूमिकेत काम केले आहे. या मालिकेतील तिच्या साध्या पोशाखाने तसेच मनमोकळ्या स्वभावाने तिने समस्त महाराष्ट्राला भुरळ घातली होती. आताही ती यात काही कमी पडू देत नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती प्रेक्षकांशी जोडून आहे. अशातच तिचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

श्रुती मराठेने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने काळ्या रंगाचा टॉप आणि काळ्या रंगाचे शॉर्ट्स घातले आहेत. यासोबत तिने पायात पांढऱ्या रंगाचे शूज घातलेले आहे. तसेच सगळे केस बांधलेले आहेत. या फोटोमध्ये ती खाली बघत पोझ देताना दिसत आहे. हलक्या स्टाईलमधील हा फोटो शेअर करून तिने एक कॅप्शन देखील दिले आहे. (marathe actress shruti marathe’s photo viral on social media)

तिने लिहिले आहे की, “स्वतःशी असे बोला, जसे तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीसोबत बोलता.” तिचा हा फोटो तिच्या चाहत्यांना नेहमी प्रमाणेच खूप आवडला आहे. तिचे चाहते या फोटोवर सातत्याने कमेंट करत आहेत. या आधी देखील श्रुतीचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

श्रृती मराठेच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने अनेक चित्रपटात काम केले आहे. तिने ‘तप्तपदी’, ‘प्रेमसूत्र’, ‘बंध नायलॉनचे’, ‘अरावण’, ‘शुभमंगल सावधान’, ‘इंदिरा विझा’ या चित्रपटात काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जिगरी यारी! अंकुश चौधरी अन् संतोष जुवेकर निघाले भटकंतीला, सोशल मीडियावर शेअर केला व्हिडिओ

-‘हा’ दिग्गज अभिनेता नसता, तर बॉलिवूडला मिळाला नसता ‘कॉमेडीचा बादशाह’ जॉनी लिव्हर; वाचा त्यांचा रंजक प्रवास

-‘शेरशाह’च्या स्पेशल स्क्रीनिंगवेळी बत्रा कुटुंबाला अश्रू अनावर; म्हणाले, ‘चित्रपटात सर्वकाही पाहायला मिळालं’

हे देखील वाचा