Saturday, October 18, 2025
Home मराठी ‘अशा भाषेत परत बोललात तर पोलीस तक्रार करेल कळलं?’, नेटकऱ्याच्या कमेंटवर भडकली अमृता खानविलकर

‘अशा भाषेत परत बोललात तर पोलीस तक्रार करेल कळलं?’, नेटकऱ्याच्या कमेंटवर भडकली अमृता खानविलकर

मराठी सिनेसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर हिने आपल्या दमदार अभिनयाने मराठीच नाही तर बॉलिवूडमध्येही छाप सोडली आहे. सतत आपल्या लावणीने प्रेक्षकांच्या मनाता घर करणारी ‘चंद्रा’ सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते. ती सध्या तिच्या आगामी चित्रपटामध्ये व्यस्त आहे. मात्र, याचदरम्यान तिने सोशल माडियावर एक पोस्ट शेअर केली होती, ज्यावर एका नेटकऱ्याने अश्लिल टीका केली आहे. मात्र, यावर अमृतानेही त्याला चांगलेच बजावले.

आपल्या दमदार लावणीने प्रेक्षकांचे लक्ष वेधणारी लोकप्रिय मराठमोठी अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) हिने सोशल मीडियावर आपल्या अधिकृत फेसबुक अकाउंटवर गुरुवार (दि, 8 डिसेंबर) रोजी गुरुचरित्रातील काही ओळींचा फोटो शेअर केला होता, ज्यावर अनेक प्रेक्षकांनी लाईक्स आणि कमेंट केल्या होत्या. मात्र, यापैकी एका चाहत्याच्या कमेंटने अमृताला संताप व्यक्त करण्यावर भाग पाडला, त्याशिवय तिच्या चाहत्यांनीही त्या व्यक्तीला चांगलेच सुनावले.

amrutakhanvilkar
झाले असे अमृताने गुरुचरित्र पुस्ताकामधील काही ओळींचा फोटो शेअर केला असून अनेक प्रेक्षकांनी तिने शेअर केलेल्या फोटोवर चांगलाच प्रतिसादही दिला. मात्र, एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहिले की, “गुरुचरित्राबद्दल बोलायची लायकी नाही तुमची. शरीर दाखवणाऱ्यांनी याबाबत बोलू नये.” ही कमेंट पाहूण अभिनेत्रीचा पारा चढला आणि तिने या व्यक्तीला सडेतोड उत्तर देत लिहिले की, ‘कोण तुम्ही? अशा भाषेत परत बोललात तर पोलीस तक्रार करेल, कळलं? याबाबतीत कोणाचं उगाच ऐकून घेणार नाही.”
amrutakhanvilkar 2
अभिनेत्रीच्या अशा कमेंटनंतर तिच्या चाहत्यांनीदेखिल त्या नेटकऱ्याला चांगलंच सुनावलं. “एका चाहत्याने लिहिले की, एखाद्या स्त्रीबद्दल असं बोलणं शोभत नाही.” तर दुसर्या चाहत्याने लिहिले की, “अमृता एक महिला आहे आणि ती उत्तम कलाकार आहे तिनं गुरू चरित्र पोस्ट करून ती खानदानी आहे हे सिद्ध केले आहे” तर एका अन्यने लिहलेकी, “Amruta Khanvilkar अमृता तुझे प्रोफेशन आहे ते त्यात तू काही चूक करते असे मला जाणवत नाही . “तू जी पोस्ट केली आहेस तू उत्तम आहे फक्त एक लक्षात ठेव कायम महाराष्ट्र घडला हा आंबेडकर, फुले आणि साठे मुळे हेच मानतात लोक बाकी टिळक,सावरकर,गोखले,गोडसे गोटया खेळत होते असे समजतात .

असो सोडून देत जा.”

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
जेव्हा रीना रॉय यांनी दिली होती शत्रुघ्न सिन्हा यांना धमकी, म्हणाल्या होत्या ‘8 दिवसात लग्न केले नाही तर…’
‘मिठाईच्या ऐवजी एक फोन…’, जेव्हा शत्रुघ्न सिन्हा यांनी परत केली होती अमिताभ बच्चन यांनी पाठवलेली मिठाई; ‘हे’ होते कारण

हे देखील वाचा