Saturday, July 6, 2024

‘मला तुझ्याकडून काहीही नको…’ अभिनेता भरत जाधवने पंढरीच्या विठूरायाला घातली भावनिक साद

भरत जाधव (Bharat Jadhav) हा मराठी सिने जगतातील एक लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो. आपल्या दमदार अभिनयाने आणि आव्हानात्मक भूमिकांमधून त्याने प्रेक्षकांची नेहमीच मने जिंकली आहेत. याच भूमिकांमुळे भरत जाधवचा मोठा चाहतावर्ग आहे. सध्या भरत जाधवच्या सोशल मीडिया पोस्टची जोरदार चर्चा रंगली आहे. या पोस्टमधून भरत जाधवने पंढरीच्या विठुरायाला भावनिक साद घातली आहे. 

कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर महाराष्ट्रात दोन वर्षांनी आषाढी पायी वारीचा सोहळा पार पडताना दिसत आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू झालेला हा भक्तीचा सोहळा आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून १० जूलैला आषाढी एकादशीला आपल्या लाडक्या विठुरायाला भेटायला हे वारकरी पंढरीत दाखल होत आहेत. या भक्तीच्या सोहळ्यात फक्त वारकरीच नव्हेतर सिने जगतातील कलाकारही मोठ्या प्रमाणावर सहभागी होत आहेत. त्याचप्रमाणे सोशल मीडियावरुनही अनेक कलाकार वारीचे फोटो शेअर करताना दिसत आहेत. सध्या अभिनेता भरत जाधवची अशीच एक भक्तीमय पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Bharat Jadhav (@sahibharat)

 

आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरुन अभिनेता भरत जाधवने ही पोस्ट शेअर केली आहे ज्यामध्ये त्याने “मला तुझ्याकडून काहीच नको. मला तू दिलेले चिरंतन देणे वेगळेच आहे,” असे म्हणत विठुरायाला भावनिक साद घातली आहे. या पोस्टसोबत अभिनेता भरत जाधवने चाहत्याने दिलेला एक सुंदर स्केचचा फोटोही पोस्ट केला आहे. या पोस्टवर भरत जाधवच्या चाहत्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्या असून ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.

दरम्यान अभिनेता भरत जाधवने नाटक, मालिका, चित्रपट अशा प्रत्येक क्षेत्रात आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. ‘नामदार मु.गनप्या गावडे’, ‘जत्रा’, ‘झपाटलेला’, ‘खबरदार’ अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. हे चित्रपट आजही प्रेक्षकांना भुरळ घालताना दिसत असतात.

हे देखील वाचा