Monday, July 8, 2024

‘सात जन्म पूर्ण करू’, बारा वर्षात पहिल्यांदाच लग्नाचा वाढदिवस साजरा करणाऱ्या प्रवीण तरडे यांची पोस्ट व्हायरल

मराठी सिनेसृष्टी आपल्या दमदार अभिनयाने, भारदस्त आवाजाने आणि अप्रतिम दिग्दर्शनाने सर्वांचेच मनं जिंकलेलं अभिनेते म्हणजे प्रवीण तरडे. प्रवीण तरडे यांनी मराठी मनोरंजनविश्वात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केलीय. अष्टपैलू व्यक्तिमत्व असणाऱ्या प्रवीण तरडे यांनी पठडीबाहेरील विषयांना हात घालत सुंदर पद्धतीने त्यांना मोठ्या पडद्यावर उतरवले आहेत. वेगळ्या विषयांवरील सिनेमे बनवणाऱ्या प्रविण तरडेंच्या सिनेमांना प्रेक्षकांची देखील मोठी पसंती मिळते. सतत कामामध्ये गुरफटलेले प्रवीण तरडे त्याच्या कुटुंबाला आणि त्यांच्या जवळच्या माणसांना अजिबात वेळ देऊ शकत नाही. मात्र आज त्यांनी त्यांच्या जीवनातील खास दिवस साजरा केला आहे. याबद्दलची माहिती त्यांनी सोशल मीडियावरही दिली आहे.

Photo Courtesy: facebook/Pravin Vitthal Tarde

आज प्रवीण तरडे आणि त्यांची पत्नी स्नेहल तरडे त्यांच्या लग्नाचा १२ वा वाढदिवस साजरा करत आहेत. हा स्पेशल दिवस साजरा करण्यासाठी ते त्यांच्या पत्नीसोबत जयपूरला गेले आहेत. याबद्दल त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना लिहिले, ” आज लग्नाचा बारावा वाढदिवस .. बारा वर्षात पहिल्यांदाच साजरा करतोय ..लग्नानंतर सुरूवातीला परिस्थिती नव्हती आणि नंतर कामाच्या व्यापात वेळ नव्हता ..यावर्षी दोन्ही वर मात करून जयपूर ला आलोय..स्नेहल एक तप पूर्ण झालं .. आता सात जन्म पूर्ण करू ..”

Photo Courtesy: facebook/Pravin Vitthal Tarde

२ डिसेंबर २००९ साली प्रवीण तरडे आणि स्नेहल यांनी लग्नगाठ बांधली. लग्नानंतर त्यांचा नवीन संसार खूपच संघर्षात सुरु झाला होता. सुरुवातीच्या काळात दहा-बाय-दहाच्या खोलीत त्यांनी त्यांचा नवीन संसार थाटला होता. मात्र नंतर काही वर्षांनी चित्र बदलत गेले, आणि प्रवीण यांना यश मिळायला सुरूवात झाली. प्रवीण तरडे यांची पत्नी स्नेहलसुद्धा अभिनेत्री आहे. ‘तुझं माझं जमेना’, ‘देऊळ बंद’, ‘चिंटू २’, ‘व्हेंटिलेटर’ आदी अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये स्नेहल यांनी काम केले आहे. एवढेच नाहीतर स्नेहल यांनी प्रवीण यांच्यासोबत काही नाटकांमध्ये कामसुद्धा केले आहे. आणि त्यांना देखील काही पुरस्कारांनी सन्मानित केले गेले आहे. प्रवीण आणि स्नेहल यांना एक मुलगा आहे.

Photo Courtesy: facebook/Pravin Vitthal Tarde

प्रवीण तरडे यांच्याबद्दल सांगायचे झाल्यास ते एका सामान्य कुटुंबातील असून त्यांचे वडील शेतकरी आहेत. आजही प्रवीण अनेकदा शेतीची कामे करताना दिसतात. ते नेहमीच सांगतात की त्यांना शेतकऱ्याचा मुलगा असल्याचा खूप अभिमान आहे. प्रवीण यांनी सुरुवातीच्या काळात रंगमंचावर काम केल्यानंतर ते मालिका आणि चित्रपटांकडे वळले. प्रवीण तरडे यांनी सुनील बर्वे, मृण्मयी देशपणे यांच्या ‘कुंकू’ या मालिकेसाठी तब्बल एक हजार भागांचे लिखाण केले होते. ही मालिका तेव्हा खूपच सुपरहिट ठरली होती. यानंतर त्यांनी ‘पिंजरा’, ‘तुझं माझं जमेना’, ‘कन्यादान’ या मालिकांसाठी लेखन केले. तर ‘कुटुंब’ या सिनेमाची कथा त्यांनी लिहिली आहे. ‘पितृऋण’ या सिनेमाची पटकथा आणि संवाद त्यांनी प्रवीण यांनी लिहिले आहेत. तर ‘रेगे’ या सिनेमाचेही संवाद आणि पटकथा त्यांनी लिहिली आहे. ‘मुळशी पॅटर्न’ या सिनेमाची कथा, पटकथा, संवाद, गीत लेखन हे त्यांनी केले आहे. या सिनेमात त्यांनी नन्याभाई हे पात्र साकारले होते. ‘देऊळ बंद’ आणि ‘मुळशी पॅटर्न’ या दोन सिनेमांचं दिग्दर्शनही प्रवीण तरडे यांनी केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

टेलिव्हिजन विश्वातील ‘या’ अभिनेत्रींनी निवडला दुसऱ्या क्षेत्रात कार्यरत असणारा जोडीदार

लग्नाच्या नुसत्या नावाने देखील चिडायची काजोल, मात्र अजयला भेटल्यानंतर बदलले विचार

बिकिनी घालून पोहणाऱ्या ‘या’ कोरिओग्राफरने लावली पाण्यात आग

हे देखील वाचा