Sunday, September 8, 2024
Home मराठी ‘हेल्मेट रागाच्या भरात फेकून…’, अँजेलो मॅथ्यूजच्या टाईमआऊटवर मराठी अभिनेत्याची सूचक पोस्ट, म्हणाला…

‘हेल्मेट रागाच्या भरात फेकून…’, अँजेलो मॅथ्यूजच्या टाईमआऊटवर मराठी अभिनेत्याची सूचक पोस्ट, म्हणाला…

एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचा 38वा सामना बांगलादेश आणि श्रीलंका या संघांमध्ये खेळवण्यात आला. या सामन्यादरम्यान अँजेलो मॅथ्यूजला टाईम आऊटमुळे बाद करण्यात आलं. त्यामुळे श्रीलंकेची पाचवी विकेट गेली. अशी घटना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अजूनही कधी घडली नव्हती. या प्रकरणी मराठी अभिनेता हृषिकेश जोशीने एक सूचक पोस्ट शेअर केली आहे. या बाद होण्याने श्रीलंकेचा संघ मोठा धक्का बसला. त्यानंतर श्रीलंकेला आणखी दोन विकेट गमवाव्या लागल्या आणि संघ 279 धावांवर आटोपला. या विजयासह बांगलादेशने स्पर्धेत आपला पहिली विजय मिळवली. तर श्रीलंका उपांत्यपूर्व फेरीतून बाहेर पडली आहे.

हृषिकेश जोशीने (Hrishikesh Joshi) पोस्टमध्ये आयुष्यातील एक-एक मिनिट किती महत्त्वाचा आहे हे सांगत अँजेलो मॅथ्यूजच्या तुटलेल्या हेल्मेटचा संदर्भ थेट वाहतुकीच्या नियमांशी जोडला आहे. त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे, “आउट होण्याचे 10 प्रकार आहेत त्यातले 9 आपण बघितलेत पण, 10व्या नियमाचं उदाहरण कधी बघायला मिळालं नव्हतं. तो पोर्शन आज अँजेलो मॅथ्यूजने पूर्ण केला. हा खेळायला आला आणि हेल्मेटचा बेल्ट लावण्यात वेळ गेला, मग दुसरं मागवलं यात एकही बॉल न खेळता 3 मिनिटं गेली आणि त्याला TIME OUT या नियमात आउट दिले गेले… अँजेलो, अरे येतानाच चांगलं हेल्मेट घालून यायचं रे…. आयुष्यात एकेक मिनिट किती महत्वाचा आहे.

बाबा… आधीच अनेक गावांत हेल्मेट घालत नाहीत, त्यात मुंबईसारख्या शहरात तर पोलीस हमखास पकडतात.. पण 100/200 ची पावती किंवा ऑनलाइन दंड भरून तुमची गाडी जाते तरी पुढं.. पण तुझी ही पावती केवढ्याला फाटली बघ… एकही बॉल न खेळता सिंहली भाषेत शिव्या देत देत आधीच खराब असलेलं तुझं हेल्मेट रागाच्या भरात फेकून द्यावं लागलं तुला.. यातून काय धडा मिळतो की,

1) वेळेचं पालन हा असाही हास्यास्पद विषय ठरतो
आणि
2) बाहेर पडताना हेल्मेट आधीच चेक करून बाहेर पडणे.

वाहतूक नियंत्रण, मुंबई पोलिसांना समर्पित..” त्याच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

यावर कमेंट करताना एकाने लिहिले की, “पोलिसांचे शंभर-दोनशेची पावती फाडायचे दिवस नाही राहिले आता पाचशेच्या पुढंच फाडतात पावती…क्रिकेटमधला हा नियम पहिल्यांदाच ऐकला अनुभवला…” (Marathi actor Hrishikesh Joshi paste on Angelo Mathews timeout goes viral)

आधिक वाचा-
सुपरहीट ‘लगान’ चित्रपटाला 22 वर्ष पुर्ण : याच चित्रपटादरम्यान बहरली होती आमीर खान-किरण रावची लवस्टोरी
नादच खुळा! कमाईच्या बाबतीत आमिर खानलाही टक्कर देते पत्नी किरण राव, जाणून घ्या तिची एकूण संपत्ती

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा