मराठी टेलिव्हिजनवरील ‘देवमाणूस’ मालिका प्रचंड लोकप्रिय आहे. देवमाणूस मालिकेचा पहिला सिझन प्रचंड गाजला होता. त्यांनंतर प्रेक्षकांच्या मागणीनंतर देवमाणुस मालिकेचा पुढची कथाही प्रेक्षकांच्या भेटीला आली. सध्या ही मालिका प्रेक्षकांचे जोरदार मनोरंजन करताना दिसत असून त्याला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद पाहायला मिळत आहे. मालिका आता लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असून प्रेक्षकांसह कलाकारही सध्या चांगलेच भावूक झालेले पाहायला मिळत आहेत. मालिकेतील मुख्य अभिनेता किरण गायकवाडने सोशल मीडिया पोस्ट केली आहे, ज्यामध्ये त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
देवमाणूस मालिकेत किरण गायकवाडने अजितसिंगची प्रमुख भूमिका साकारली होती. मालिकेतील त्याच्या अभिनयाचे प्रचंड कौतुक होत आहे. आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. त्याआधी किरण गायकवाडची भावूक पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. यामध्ये किरण गायकवाडने मालिकेतील या प्रवासाचे सुंदर शब्दात वर्णन केले आहे.
यामध्ये तो म्हणतो की, “एका तळ्यात होती बदके पिले सुरेख , होते नीच ; हरामी पिलू तयात एक” भयाण शांतता मेकउप रूम मध्ये , उर भरून आलेला , डोळ्यांची हलकी किनार ओलावलेली शेवटी ती वेळ आलीच “निरोपाची” आज रात्री देवमाणूस चा शेवटचा भाग प्रसारित होणार आहे . उद्यापासून आमची team तुमचं मनोरंजन करायला तुमच्यासमोर नसेल. काल गणपती गेले जाताना आपल्या बरोबर .देवीसिंग , फेक डॉक्टर , देवमाणूस अशी तोतया माणसं, negative माणस सोबत घेऊन गेले , खरतर ती या आपल्या आजूबाजूला असतातच गोड बोलून आपल्याला त्यांच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत असतात अश्या बुरख्याआड लपलेल्या माणसाचा बुरखा समाजासमोर आणावा तो फाडावा असा आमचा मानस होता.”
“अशी बोलघेवडी माणसं आपल्या आजूबाजूला असतील तर आपण वेळीच सावध होऊया. मालिका संपत असताना बर्याच प्रेक्षकांचे फोन , मेसेज येताएत की आम्हाला देवमाणसाचा खूप राग येतो त्याला आम्ही खूप शिव्या ही घालतो. पण ही मालिका बंद नका करू, मालिका संपताना सुद्धा एवढा प्रेक्षकांच प्रेम पाहून भाराऊन जायला होता. डॉ. ला फाशी झाली , त्याची तोंडाला काळ फासून धिंड काढण्यात आली , त्याची किरडी ढासळली. या आणि आजून ज्या महाराष्ट्राच्या ईछ्या होत्या त्या सगळ्या पूर्ण झाल्या. ही भूमिका करताना खूप मेहनत घ्यावी लागली.”
“कारण अश्या प्रकारची माणस आपल्या आजूबाजूला नसतातच मग आता काय तर एक कलाकार म्हणून तुम्हाला एक visual तयार करून असा एक माणूस उभा करायचा असतो फक्त उभाच नाही नाही तर तो माणूस खरा आहे, तो असाच वागतो, असाच बोलतो, असाच चालतो असा आभास निर्माण करायचा आहे. (सगळ दिग्दर्शकाला विचारून) हे सगळं करत असताना मानसिक लेवल ला खूप दमछाक व्हायची, सुरूवातीला तर कित्तेक दिवस रात्रीची झोप पण उडाली होती कारण बर्याच गोष्टी स्वभावाच्या विरूद्ध जाऊन कराव्या लागल्या.”
“अनेक लोक आहेत ज्यांच्यामुळे हा गोवर्धन पर्वत उचलता आला . इतिहासाला फक्त श्रीकृष्णाची करंगळी दिसेल पण त्यासोबत हजारो काठ्यांचा टेकू नाही दिसणार “देवमाणूस” हा पर्वत उचलायला ज्यांची ज्यांची मदत झाली त्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद.” सध्या त्याची ही पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे.
हेही वाचा – अक्षराचा ‘नैतिक’ बनत घराघरात पोहोचला करण मेहरा; बॉलिवूडच्या दिग्गज डायरेक्टरसोबतही केलंय काम
शालिनी पांडेच्या बहिणीची सिनेसृष्टीत धमाकेदार एंट्री, सांगितला ६ वर्षाचा संघर्षमय प्रवास
अंगुरी भाभीची झाली ऑनलाईन फसवणुक, अभिनेत्रीने चाहत्यांना केले ‘हे’ आवाहन