Thursday, March 13, 2025
Home मराठी ‘मला संपवायला निघालेल्यांचा सुफडासाफ झाला’, अभिनेते किरण माने यांची पोस्ट चर्चेत

‘मला संपवायला निघालेल्यांचा सुफडासाफ झाला’, अभिनेते किरण माने यांची पोस्ट चर्चेत

मराठी सिनेसृष्टीत असे अनेक अभिनेते आहेत जे त्यांच्या अभिनयाइतकेच सोशल मीडियावरही नेहमीच सक्रिय असतात. आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन ते नेहमीच विविध विषयांवर आपले मत मांडताना दिसत असतात. यामध्ये अभिनेते किरण माने यांचे नाव पहिल्यांदा घेतले जाते. आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन ते नेहमीच विविध विषयांवर आपले परखड मत मांडताना दिसत असतात. सध्या त्यांची अशीच एक पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे ज्यामध्ये त्यांनी मुलगी झाली हो मालिकेतील कलाकारांबद्दल महत्वाचे वक्तव्य केले आहे. 

किरण माने (Kiran Mane) हे मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेते म्हणून ओळखले जातात. त्यांची मुलगी झाली हो मालिकेतील भूमिका प्रचंड गाजली होती. मात्र त्यांना या मालिकेतून तडकाफडकी काढून टाकल्याचा वाद चांगलाच रंगला होता. यावेळी किरण माने यांनी राजकिय पोस्ट केल्याने काढून टाकल्याचे सांगितले होते. सिने जगतात हा वाद चांगलाच रंगला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा अभिनेते  किरण माने यांच्या पोस्टने हा वाद चर्चेत आला आहे. सध्या किरण माने यांची नवीन पोस्ट सोशल मीडियावर होत आहे, ज्यामध्ये त्यांनी झी मराठी चॅनेलचे आभार मानले आहेत, तर अभिनेत्री अनिता दातेचे कौतुकही केले आहे. काय आहे ही नेमकी त्यांची पोस्ट वाचा त्यांच्याच शब्दात.

“झी मराठी’, तुमचे लै लै लै आभार. सहा महिन्यांपूर्वी माझ्या ‘अत्यंत वादग्रस्त ठरवल्या गेलेल्या’ विषयाला, तुमच्या प्राईम टाईममध्ये स्थान देऊन, त्यावर योग्य ते मत विचारायचं आनि मांडायचं ‘स्वातंत्र्य’ सुबोध भावे-अनिता दातेला दिल्याबद्दल. खरंतर मी कधीच कुनाच्या पाठिंब्याची अपेक्षा ठेवली नव्हती. सत्यासाठी एकटा लढायची हिम्मत हाय माझ्यात. खरा मानूस कुनाच्या बापाला भेत नाय. पन त्यावेळी मूग गिळून गप्प बसलेल्या कणाहीन मराठी कलाकारांची दया मात्र आलीवती. “नक्की सेटवर काय घडलंय हे आम्हाला माहीती नाही.” या बुरख्याआड बिचारे जीव दडून बसले.”

https://www.facebook.com/kiran.mane.9047

“आता हे सगळं बघून ‘सत्य’ ओळखनं अवघड नव्हतं. सर्वसामान्य प्रेक्षकांनी ते जानलं आनि स्वत:ची ताकद दाखवली. त्यांनी सिरीयल बघनंच सोडून दिलं. तीन म्हैन्यात टीआरपी घसरन्याची नामुष्की येऊन, सिरीयलला प्राईम टाईमचा स्लाॅट गमवावा लागला. त्यानंतर तीन म्हैन्यात आनखी एक सातारी हिस्का बसला.” याजवळ आमच्याच आधारानं जिथं ‘कधी स्वस्तात-कधी फुकटात’ शुटिंग चाललंवतं तिथनं लाथ बसली. हकालपट्टी झाली. सगळं चंबूगबाळं आवरुन जावं लागलं मुंबैला. मला संपवायला निघालेल्यांचा सहा म्हैन्यात सुफडासाफ झाला. पन मी उभाच हाय. भक्कम. पाय रोवून” दरम्यान किरण माने या पोस्टने पुन्हा एकदा जुना वाद चर्चेत आला आहे.

हेही वाचा –अमिताभ बच्चन यांनी खास शैलीत केले राष्ट्रगीत सादर, व्हिडिओवर कौतुकाचा वर्षाव

‘हिंदू नपुंसक कधी झाला कळालेच नाही’, अभिनेते शरद पोंक्षे यांचे वक्तव्य

तमन्ना भाटियाच्या छोट्याशा कृतीने जिंकली नेटकऱ्यांची मने, व्हायरल व्हिडिओवर कौतुकाचा वर्षाव

 

हे देखील वाचा