Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘अख्ख घर दाटून आल्यासारख झालंय..’ कुशल बद्रिकेच्या ‘त्या’ खास पोस्टची सोशल मीडियावर चर्चा

 कुशल बद्रिके (Kushal Badrike) हा लोकप्रिय मराठी अभिनेता म्हणून प्रसिद्ध आहे. आपल्या जबरदस्त कॉमेडी टायमिंगने आणि विनोदी भूमिकांनी तो नेहमीच प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन करत असतो. चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाने कुशल बद्रिकेला सर्वत्र लोकप्रियता मिळवून दिली. कार्यक्रमातील त्याच्या भूमिका आणि अभिनयाला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद पाहायला मिळतो.  सध्या कुशल बद्रिकेने सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. काय आहे नेमकी ती पोस्ट चला जाणून घेऊ. 

जून महिना सुरू झाला आणि सर्वांनाच वरुणराजाच्या आगमनाची आतुरता लागलेली असते. प्रत्येकजण पहिल्या पावसात भिजायला, पहिला पाऊस अनुभवायला आतुर झालेला असतो. पहिल्या पावसाच्या आगमनाचा आनंद प्रत्येकजण आपापल्या अनोख्या स्टाईलने व्यक्त करत असतो. आपल्या अभिनयाइतकाच सोशल मीडिया पोस्टमुळेही अभिनेता कुशल बद्रिके नेहमीच चर्चेत असतो. अभिनेता कुशल बद्रिकेनेही आपल्या खास अंदाजात एका फोटोसोबत पहिल्या पावसाचा आनंद व्यक्त केला आहे. सध्या त्याची ही पोस्ट सर्वत्र चर्चेत आहे.

आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरुन कुशल बद्रिकेने ही पोस्ट शेअर केली आहे. या व्हायरल फोटोमध्ये कुशल बद्रिकेची दोन्ही मुले खिडकीतून बाहेर पडणाऱ्या पावसाचा आनंद घेताना दिसत आहेत. खिडकीबाहेरील दाटून आलेले ढग, पावसाच्या सरी आणि समोर समोरचे विहंगम दृश्य खूपच मनमोहक दिसत आहे. या फोटोपेक्षा कुशल बद्रिकेने दिलेल्या कॅप्शनचीच सर्वात जास्त चर्चा रंगली आहे. ज्यामध्ये त्याने “माझी दोन्ही आभाळं गॅलरीमधून पाऊस पहातायत,
आणि अख्ख घर दाटून आल्यासारख झालंय,” अशा सुंदर ओळी लिहल्या आहेत. कुशल बद्रिकेच्या या पोस्टवर त्याच्या चाहत्यांच्या जोरदार प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा