Friday, November 22, 2024
Home मराठी लसीचे दोन्ही डोस घेतलेले असूनही जेष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना कोरोनाची लागण

लसीचे दोन्ही डोस घेतलेले असूनही जेष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना कोरोनाची लागण

संपूर्ण भारतात कोरोना विषाणूचा फैलाव वाढत आहे. रुग्णसंख्या देखील वाढत आहे. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेने रौद्र रूप धारण केले आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने लॉकडाऊनचा पर्याय निवडला आहे. या लॉकडाऊनचा फटका अनेक मालिका आणि चित्रपटांवर झाला आहे. महाराष्ट्रात शूटिंगला मनाई आहे. एकीकडे लॉकडाऊन चालू असताना दुसरीकडे मात्र लसीकरणाच्या वेग सरकारने वाढवला आहे. तरीही कोरोना रुग्णांची संख्या मंदावताना दिसत नाहीये. अनेकांनी लसीचा डोस घेऊनही त्यांना कोरोना झाल्याचे निदर्शनास आले आहे. याच कोरोनाची बाधा आता झाली आहे ते मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना. त्यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस पूर्ण करूनही त्यांना कोरोना झाला आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात शूटिंगला बंदी आणल्यानंतर अनेक मालिकांनी त्यांच्या शूटिंगचे ठिकाण बदलले आहे. यात झी मराठीवरील ‘अगबाई सूनबाई’ या मालिकेची टीम देखील मुंबईहून गोव्याला शूटिंगसाठी रवाना झाली होती. परंतु गोव्यातील कोरोना ग्रस्तांची संख्या लक्षात घेता तेथील सरकारने देखील शूटिंगवर निर्बंध लादले आहेत. त्यामुळे या मालिकेची संपूर्ण टीम पुन्हा मुंबई आली. मुंबई आल्यानंतर मोहन जोशी यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर आली.

मोहन जोशी यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले असल्याचे माहिती त्यांनी दिली आहे. तरी देखील ते कोरोनाचे शिकार बनले आहेत. याच मालिकेतील आसावरी म्हणजेच निवेदिता सराफ यांना देखील वर्षी ‘अगंबाई सासूबाई’ ही मालिका चालू असताना कोरोना झाला होता. तसेच ‘पाहिले न मी तुला’ या मालिकेतील आशय कुलकर्णी म्हणजेच अनिकेतला देखील कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे तो गोव्याला शूटिंगसाठी जाऊ शकला नव्हता.

मोहन जोशी हे मराठी चित्रपट सृष्टीतील एक नावाजलेले कलाकार आहेत. त्यांनी अनेक चित्रपट,नाटकं आणि मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच हिंदी चित्रपटात देखील त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांनी ‘पुष्पक विमान’, ‘डॉक्टर काशिनाथ घाणेकर’, ‘मुळशी पॅटर्न’, ‘वृंदावन’, ‘सवत माझी लाडकी’ यासारख्या अनेक चित्रपटात आणि मालिकांमध्ये काम केले आहे.

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा