लंडनमध्येही जपलाय मराठी बाणा, दिग्दर्शक प्रविण तरडेंच्या व्हिडिओवर होतोय कौतुकाचा वर्षाव

0
106
pravin tarde london
Photo Courtesy : Facebook/ Pravin tarde

मराठी सिने जगतातील लोकप्रिय दिग्दर्शक आणि अभिनेते म्हणून प्रविण तरडे  (Pravin Tarde) यांचे नाव घेतले जाते. त्यांच्या दिग्दर्शनाचे, अभिनयाचे सोशल मीडियावर नेहमीच कौतुक होताना दिसत असते. अभिनय आणि दिग्दर्शनासाठी ओळखले जाणारे प्रविण तरडे सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असतात. आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन ते नेहमीच विविध विषयांवर भाष्य करताना दिसत असतात. सध्या प्रविण तरडेंचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे ज्यामध्ये लंडनवारीवर असलेले प्रविण तरडेंनी दाखवलेला मराठी बाणा सर्वत्र कौतुकाचा विषय ठरताना दिसत आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण चला जाणून घेऊ. 

एक लोकप्रिय लेखक, दिग्दर्शक, अभिनेते म्हणून प्रविण तरडे यांचे नाव घेतले जाते. ‘मुळशी पॅटर्न’ सारख्या दमदार चित्रपटाचे  दिग्दर्शन करणारे प्रविण तरडे हे मराठी सिने जगतातील एक रांगडे व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाते. अलिकडेच प्रविण तरडे यांचे ‘धर्मवीरः मुक्काम पोस्ट ठाणे’ तसेच ‘सरसेनापती हंबिरराव’ हे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. या चित्रपटांनी मराठी सिनेमांमध्ये कमाईचे नवनवे विक्रमच प्रस्थापित केले. यमधील ‘धर्मवीरः मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाचे ते दिग्दर्शक होते. तर ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटात त्यांनी स्वतः हंबिरराव मोहिते यांची भूमिका साकारली होती. या भूमिकेतील प्रविण तरडे यांच्या दमदार अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले.

https://fb.watch/enrbR544To/

या चित्रपटांच्या दमदार यशानंतर अभिनेते प्रविण तरडे पत्नीसोबत लंडनवारीवर गेले आहेत. सध्या त्यांचा लंडनमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.लंडनदौऱ्यावर असलेले प्रविण तरडे नाटक पाहायला गेले होते. यावेळी त्यांनी केलेला मराठमोळा पेहराव तर पत्नी स्नेहल तरडे यांनीही घातलेली नऊवारी साडी सर्वत्र कौतुकाचा विषय ठरत आहे. या व्हिडिओमध्येही प्रविण तरडे यांनी आपण कोणत्या भूमीतुन आलो आहोत हे लंडनमध्येही समजल पाहिजे म्हणूनच हा मराठमोळा लूक केला असे म्हणताना दिसत आहेत.

दरम्यान प्रविण तरडे यांच्या या व्हिडिओचे सोशल मीडियावर प्रचंड कौतुक  होत आहे. या व्हिडिओवर अनेकांनी लंडनमध्ये मराठी बाणा जपला जातोय अशा बोलक्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here