मराठी सिनेसृष्टीत सध्या अनेक नवनवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या चित्रपटांना प्रेक्षकांचाही जोरदार प्रतिसाद पाहायला मिळत आहे. दिग्दर्शक रवी जाधव यांचा ‘टाईमपास ३’ चित्रपटही सध्या चांगलाच चर्चेत आहे. याआधी ‘टाईमपास’ आणि ‘टाईमपास २’ चित्रपट प्रचंड लोकप्रिय ठरल्यानंतर आता टाईमपास ३ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्याआधी ‘टाईमपास २’ चित्रपटात दगडूची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता प्रियदर्शन जाधवची एक पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे, या पोस्टमध्ये त्याने टाईमपास मधील दगडू म्हणजेच अभिनेता प्रथमेश परबला चित्रपटासाठी हटके शुभेच्छा दिल्या आहेत. काय आहे हे प्रकरण चला जाणून घेऊ.
सध्या दिग्दर्शक रवी जाधव यांचा ‘टाईमपास ३’ चित्रपट चांगलाच चर्चेत आला आहे. येत्या २९ जूलैला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे सध्या जोरदार प्रमोशन सुरू आहे. नेहमी प्रमाणेच चित्रपटाची जोरदार कथा आणि कलाकारांमुळे या चित्रपटाचीही प्रेक्षकांना जोरदार उत्सुकता लागली आहे. ‘टाईमपास ३’ चित्रपटात ऋता दुर्गुळे, प्रथमेश परब, भाऊ कदम, संजय नार्वेकर यांच्या भूमिका पाहायला मिळणार आहेत. याआधी ‘टाईमपास २’ चित्रपटात दगडूची भूमिका प्रियदर्शन जाधवने साकारली होती. आता पुन्हा एकदा प्रेक्षकांना दगडूच्या भूमिकेतील प्रथमेश परब पाहायला मिळणार आहे. त्याआधीच प्रियदर्शन जाधवची पोस्ट व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
अभिनेता प्रियदर्शन जाधवने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन ही पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्याने, “प्रिय प्रथमेश उद्या Tp3 प्रदर्शित होईल , आणि सुपरहिट सुद्धा होईल. तुला खूप खूप शुभेच्छा. केवळ आणि केवळ आणि केवळ तुझ्या प्रेमापोटी ( फोटो पुरावा आहे ) मी timepass ३ लिहिला,नाहीतर मी काही लिहीत नसतो, हे तू लक्षात घे आणि “हेतू” ही लक्षात घे, हल्ली सगळं seriously घेणारा मी, टाइमपास करत लिहित नसतो. खूप खूप यशस्वी हो,” असे म्हणत हटके शब्दात कौतुक केले आहे. सध्या अभिनेता प्रियदर्शन जाधवची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा –
‘प्रिय शमशेरा…’, चित्रपट फ्लॉप होताच करण मल्होत्राची ‘ती’ भावूक पोस्ट व्हायरल
सर्वाधिक पोलिसांची भूमिका निभावून जगदीश राज खुराना यांनी केला होता रेकॉर्ड, वाचा त्यांची कहाणी
आमिर खानसोबतच्या ‘त्या’ जाहिरातीने बदलले हुमा कुरैशीचे आयुष्य, ‘असा’ मिळाला होता पहिला चित्रपट