गाव..प्रेम..राजकारण! लवकरच येतोय ‘स्टोरी ऑफ लागीरं’, संजय खापरे अभिनित चित्रपटाचे पोस्टर लाँच


विनोदी आणि गंभीर भूमिकांमध्ये तितक्याच सहजतेने वावरणारा अभिनेता संजय खापरे ‘स्टोरी ऑफ लागीरं’ या चित्रपटात पोलिसाच्या महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. दिनांक १४ जानेवारी रोजी हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून रोहित राव नरसिंगे, चैताली चव्हाण, ऋतुजा अंद्रे हे नव्या दमाच्या कलाकारांचे या चित्रपटातून पदार्पण होत आहे.

स्टोरी ऑफ लागीरं या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच लाँच करण्यात आले. रॉयल समृद्धी असोसिएट्स आणि स्वरुप वैशाली बाळासाहेब सावंत प्रस्तुतकर्ते असून जी. के. फिल्म्स क्रिएशसनं निर्मिती केली आहे.

हेही वाचा – मकरंद माने दिग्दर्शित ‘पोरगा मजेतंय’ चित्रपटाची ‘या’ पुरस्कारावर मोहोर, विसावं ‘पिफ’ मार्च २०२२मध्ये

Story-of-Lagir
Marathi film Story of Lagir

बी. एन. मेश्राम चित्रपटाचे निर्माते, यामिनी वाघडे सहनिर्मात्या आहेत. रोहित राव नरसिंगे यानी चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. तर मंगेश गाडेकर यांनी छायांकन, सनी-सुशांत आणि अतुल जोशी यांची संगीत, निहार राजहंस, बी. गोपानारायण यांनी गीतलेखन, मीडिया वर्क्स स्टुडिओने पोस्ट प्रॉडक्शनची जबाबदारी निभावली आहे.

स्टोरी ऑफ लागीरं या नावावरून हा चित्रपट एका गावाच्या पार्श्वभूमीवर घडणारा, त्यासोबतच चित्रपटाच्या केंद्रस्थानी प्रेमकथा, राजकारण असल्याचा अंदाज बांधता येतो. रोहित राव नरसिंगे, चैताली चव्हाण, ऋतुजा अंद्रे, मोहन जाधव, सोमनाथ येलनूरे यांच्यासह संजय खापरे, मिलिंद दास्ताने, प्रेमाकिरण असे अनुभवी कलाकारही असल्याने हा चित्रपट नक्कीच प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे आकर्षित करेल यात शंका नाही.

अधिक वाचा –


Latest Post

error: Content is protected !!