Wednesday, July 3, 2024

धक्कादायक! लोकप्रिय मराठी अभिनेत्याचे फेसबूक अकाउंट केले हॅक, अश्लिल फोटो होतायेत शेअर

संतोष जुवेकर (Santosh Juvekar) हा मराठी सिने जगतातील एक लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो. आपल्या दमदार अभिनयाने आणि डॅशिंग लूकने त्याने चित्रपट जगतात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. परंतु सध्या अभिनेता संतोष जुवेकर त्याच्या चित्रपटामुळे नव्हेतर एका सोशल मीडिया पोस्टमुळे चांगलाच चर्चेत आला आहे. आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरुन संतोषने ही पोस्ट केली असून ज्यामधून त्याने फेसबूक अकाउंट हॅक झाल्याचे सांगितले आहे. काय आहे हे प्रकरण चला जाणून घेऊ. 

अभिनेता संतोष जुवेकर हा मराठी सिनेजगतातील एक प्रतिभावान अभिनेता म्हणून ओळखला जातो. ‘झेंडा’, ,’मोरया’, ‘रेगे’ अशा एकापेक्षा एक दमदार मराठी चित्रपटांमध्ये अभिनेता संतोष जुवेकरने भूमिका साकारल्या आहेत. आपल्या अभिनयाइतकाच तो सोशल मीडियावरही नेहमीच सक्रिय असतो, ज्यामधून तो आपल्या चाहत्यांशी नेहमीच विविध फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो. परंतु अलिकडेच सध्या संतोषचे फेसबूक अकाउंट हॅक झाल्याची माहिती त्याने सोशल मीडियावरुन दिली आहे तसेच त्यावरुन अश्लिल फोटो शेअर केले जात असल्याचाही धक्कादायक खुलासा संतोषने केला आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Santosh Juvekar (@santoshjuvekar12)

 

याबाबतची पोस्ट संतोषने आपल्या अधिकृत इंंस्टाग्राम अकाउंटवरुन केली आहे. ज्यामध्ये त्याने “मित्रांनो माझ फेसबूक पेज काही महिन्यांन पूर्वी हॅक झालं होत. त्यावर फारच अश्लील फोटो पोस्ट केले जात आहेत. मी ह्याची रीतसर तक्रार केली आहे सायबर क्राईम आणि लोकल पोलिस स्टेशनला पण अजूनही ही व्हायातगीरी सुरूच आहे. कृपया करून त्या पेजला रिपोर्ट आणि ब्लॉक करा. माझ्या त्या पेजच्या profile चा screenshot इथे टाकत आहे जेणे करून तुम्हाला ते ओळखण्यास सोप्पे जाईल. तुमच्या ह्या सहकार्यासाठी धन्यवाद,” अशी माहिती त्याने आपल्या चाहत्यांना दिली आहे. सध्या संतोष जुवेकरची ही पोस्ट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हे देखील वाचा