Wednesday, July 3, 2024

‘ॲक्टर बिक्टर सगळं बाहेर, घरी आणि मित्रांमध्ये चड्डीत राहायचं’, संतोष जुवेकरला दोस्तांनी फटकवला

मराठी चित्रपट जगतात असे अनेक अभिनेते आहेत जे चित्रपट जगतात यशाच्या शिखरावर जाऊनही त्यांचे पाय मात्र जमिनावरच आहेत. हे अभिनेते स्टार असल्याचा कसलाही बडेजाव न करता सामान्य लोकांमध्ये इतक्या सहजपणे मिसळून जातात म्हणूनच त्यांचे चाहते या कलाकारांना कायमच डोक्यावर घेत असतात. आता प्रसिद्ध अभिनेता संतोष जुवेकरचाही (Santosh Juvekar) असाच एक व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्याचा साधेपणा आणि मित्रांमधला मिसळून मार खाणारा संत्या बघून प्रत्येकजण या व्हिडिओचे कौतुक करत आहे. काय आहे हा व्हिडिओ चला जाणून घेऊ. 

संतोष जुवेकर हा मराठी चित्रपट जगतातील एक स्टायलिश स्टार म्हणून ओळखला जातो. आपल्या दमदार अभिनयाने आणि देखण्या लूकने त्याने मराठी चित्रपट जगतात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याच्या अभिनयातील जिवंतपणा आणि डॅशिंगपणा प्रत्येकालाच भावत असतो म्हणूनच संतोष जुवेकरच्या चित्रपटांचे आणि अभिनयाचे नेहमीच कौतुक होत असते. संपोष जुवेकर जितका त्याच्या अभिनयासाठी प्रसिद्ध आहे तितकाच तो साधेपणा आणि दिलदार व्यक्तीमत्वामुळेही नेहमीच चर्चेत असतो. मोठा स्टार असूनही तो त्याच्या मित्रांमध्ये बिनधास्त वावरत होतो. सध्या त्याचा असाच एक व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे.

हा व्हायरल व्हिडिओ खुद्द अभिनेता संतोष जुवेकरने स्वतः त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन पोस्ट केला आहे. ज्यामध्ये तो मित्रांसोबत बसून गाडीतून प्रवास करताना दिसत आहे. यावेळी संतोष जुवेकर मित्रामध्ये बसून कसला स्टार दिसतोय म्हणतो आणि त्याचे मित्र त्याला फटके द्यायला सुरूवात करतात. हा मजेशीर व्हिडिओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. या व्हिडिओसोबत संतोषने ते “एक्टर बिक्टर, स्टार फार सगळं बाहेर हं, घरी आणि मित्रांमधे चड्डीत रहायच.” असे जबराट कॅप्शन दिले आहे. मराठी चित्रपट जगतात एकापेक्षा एक दमदार आणि डॅशिंग भूमिका साकारणाऱ्या या प्रसिद्ध अभिनेत्याचे हे मित्रप्रेम आणि मातीशी जुळलेली घट्ट नाळ याचं उत्तम उदाहरण या व्हिडिओत दिसत आहे म्हणूनच हा व्हिडिओ सध्या चर्चेत आला आहे.

दरम्यान, अभिनेता संतोष जुवेकरने ‘झेंडा’, ‘शर्यत’, ‘फक्त लढं म्हणा’, ‘मोरया’ अशा अनेक गाजलेल्या चित्रपटात काम केले होते. त्याच्या या चित्रपटातील दमदार अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले होते. या चित्रपटांनी संतोष जुवेकरची एक तगडा, देखणा तरुण अभिनेता अशीच ओळख सिनेजगतात झाली होती. संतोषने छोट्या पडद्यावरही या ‘गोजिरवाण्या घरात’, ‘असं सासरं सुरेख बाई’, ‘वादळवाट’ अशा लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा