Friday, August 1, 2025
Home मराठी हातात ध्वज फडकवत शिव ठाकरेने शेअर केला फोटो, दिल्या स्वातंत्रदिनाच्या ‘हटके’ शुभेच्छा

हातात ध्वज फडकवत शिव ठाकरेने शेअर केला फोटो, दिल्या स्वातंत्रदिनाच्या ‘हटके’ शुभेच्छा

टेलिव्हिजनवरील ‘बिग बॉस’ हा सर्वांचा लोकप्रिय शो आहे. हिंदीमधील या शोची लोकप्रियता बघता हा शो मराठीमध्ये देखील सुरु केला गेला आहे. मराठीमध्ये या शोचे दोन सिझन पूर्ण झाले आहेत. यातील सर्वात चर्चेत दुसरा सिझन आणि यातील स्पर्धक होते. या शोमधील सर्वांचाच लाडका आणि विजेता स्पर्धक म्हणजे शिव ठाकरे होय. शिव ठाकरे हा बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वाचा विजेता होता. त्यानंतर तो खूप चर्चेत आला होता. परंतु तो नंतर काही खास निदर्शनास आला नाही. सध्या तो त्याच्या सोशल मीडिया पोस्टवरून खूप चर्चेत आहे. रविवारी (१५ ऑगस्ट) त्याने सर्वांना स्वातंत्रदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी शिव एका वेगळ्याच पोशाखात दिसत आहे.

शिव ठाकरेने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये तो एका वेगळ्याच लूकमध्ये दिसत आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, शिवने धोतर घातले आहे. तसेच तो एका डोंगरावर उभा राहून, त्याने हातात तिरंगा घेतलेला आहे. तो हातात ध्वज फडकवताना दिसत आहे. या लूकमध्ये तो खूपच आकर्षक दिसत आहे. हा फोटो शेअर करून त्याने “स्वातंत्रदिनाच्या शुभेच्छा” असे लिहिले आहे. त्याचा हा फोटो त्याच्या चाहत्यांना खास पसंत पडला आहे. अनेक चाहते या फोटोवर हार्ट ईमोजी पोस्ट करत आहे. त्याच्या या फोटोवर अभिनेत्री वीणा जगताप हिने देखील कमेंट केली आहे.

शिवने याआधी एम टीव्हीवरील ‘रोडीज’ या शोमध्ये भाग घेतला होता. त्यानंतर तो ‘बिग बॉस’मुळे खूप चर्चेत आला होता. या शोमध्ये त्याचे आणि वीणा जगतापचे अफेअर खूप गाजले होते. नुकतेच काही दिवसांपूर्वी त्याचे ‘शिलावती’ हे गाणे प्रदर्शित झाले आहे. दर्शकांनी त्याच्या या गाण्याला जोरदार प्रतिसाद दिला आहे. (marathi actor shiv thakare give wishesh on independence day )

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘ये वतन वतन मेरे आबाद रहे तू’, गाण्यावर डान्स करत रिंकूने दिल्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा; तुम्हीही पाहा

-स्वातंत्र्यदिनाचा उत्साह परदेशातही! अमेरिकन व्यक्तीने ‘चक दे इंडिया’ गाण्यावर केला भन्नाट डान्स

-स्वातंत्र्यदिनानिमित्त चाहत्याने शेअर केला बिग बींचा ‘असा’ फोटो; ते पाहून अभिनेत्यालाही द्यावी लागली प्रतिक्रिया

हे देखील वाचा