टेलिव्हिजनवरील ‘बिग बॉस’ हा एक लोकप्रिय शो आहे. हिंदीमधील या शोची लोकप्रियता बघता हा शो मराठीमध्ये देखील सुरू केला गेला आहे. मराठीमध्ये या शोचे दोन सिझन पूर्ण झाले आहेत. यातील सर्वात चर्चेत दुसरा सिझन आणि यातील स्पर्धक होते. या शोमधील सर्वांचाच लाडका आणि विजेता स्पर्धक म्हणजे शिव ठाकरे होय. शिव ठाकरे हा बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वाचा विजेता होता. त्यानंतर तो खूप चर्चेत आला होता. शिव सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. अशातच त्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
शिवने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक वेगळ्या लूकमधील फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, त्याने पिवळ्या रंगाचा टी-शर्ट आणि केशरी रंगाची पँट परिधान केली आहे. तसेच या ड्रेसला मिसमॅच पांढऱ्या आणि काळ्या रंगाचे बूट घातले आहेत. या फोटोमध्ये तो उडी मारताना दिसत आहे. (Marathi actor shiv thakare share his stylish photo on social media)
त्याने शेअर केलेला हा फोटो त्याच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. त्याच्या चाहत्यांना हा आगळा- वेगळा लूक खूप आवडत आहे. त्याचे चाहते फोटोवर सातत्याने कमेंट करून त्याच्या या नवीन लूकचे कौतुक करत आहेत. त्याच्या या फोटोला आतापर्यंत १३ हजारांपेक्षाही जास्त लाईक्स मिळाले आहेत.
शिवने याआधी एम टीव्हीवरील ‘रोडीज’ या शोमध्ये भाग घेतला होता. त्यानंतर तो ‘बिग बॉस’मुळे खूप चर्चेत आला होता. या शोमध्ये त्याचे आणि वीणा जगतापचे अफेअर खूप गाजले होते. या शोमध्ये त्याने त्याच्या प्रेमळ आणि मनमिळावू स्वभावाने घरातील सदस्यांचे मन जिंकून घेतले होते. तसेच त्याने सगळ्या प्रेक्षकांचे देखील मन जिंकले होते. त्यामुळेच तो बिग बॉसच्या दुसऱ्या सिझनचा विजेता ठरला होता. मागील काही दिवसांपूर्वी त्याचे ‘शिलावती’ हे गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्याला प्रेक्षकांनी जोरदार प्रतिसाद दिला होता.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-उर्मिला मातोंडकरने सांगितला गणेश उत्सवाचा अनुभव; म्हणाली, ‘आम्ही कोकणातील आमच्या घरी…’
-‘दिसला गं बाई दिसला’, म्हणणाऱ्या ‘राजा राणीची गं जोडी’ फेम संजूचा गावरान अवतार भावला नेटकऱ्यांना