Friday, August 1, 2025
Home मराठी ‘संपूर्ण मार्केट गाजवण्याचा इरादा आहे का?’, मराठमोळ्या शिव ठाकरेच्या फोटोवर चाहत्याची भन्नाट कमेंट

‘संपूर्ण मार्केट गाजवण्याचा इरादा आहे का?’, मराठमोळ्या शिव ठाकरेच्या फोटोवर चाहत्याची भन्नाट कमेंट

टेलिव्हिजनवरील ‘बिग बॉस’ हा एक लोकप्रिय शो आहे. हिंदीमधील या शोची लोकप्रियता बघता हा शो मराठीमध्ये देखील सुरू केला गेला आहे. मराठीमध्ये या शोचे दोन पर्व पूर्ण झाले आहेत. यातील सर्वात चर्चेत दुसरे पर्व आणि यातील स्पर्धक होते. या शोमधील सर्वांचाच लाडका आणि विजेता स्पर्धक म्हणजे शिव ठाकरे होय. शिव हा बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वाचा विजेता बनल्यानंतर खूप चर्चेत आला होता. तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. अशातच त्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

शिवने सोशल मीडियावर त्याचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्याने पिवळ्या आणि हिरव्या रंगाची पँट आणि हुडी घातली आहे. या हुडीची टोपी त्याने डोक्यावर घातली आहे. त्याने पायात पांढऱ्या रंगाचे शूज घातले आहेत. या फोटोमध्ये तो अगदी स्टायलिश दिसत आहे. फोटोमध्ये त्याचा चेहरा नीट दिसत नाहीये. त्याने ओठांवर बोट ठेवले आहे. (Marathi actor shiv thakare share his stylish photo on social media)

हा फोटो शेअर करून त्याने “शअअअ,” असे कॅप्शन दिले आहे. त्याचा हा फोटो त्याच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. त्याच्या एका चाहत्याने या फोटोवर कमेंट केली आहे की, “संपूर्ण मार्केट गाजवण्याचा इरादा आहे का?” तसेच अनेक चाहते या फोटोवर कमेंट करत आहेत. अलीकडे शिव अनेक स्टायलिश लूकमधील फोटो शेअर करत असतो. काहींना त्याचा हा लूक आवडतो, तर काही जण त्याला ट्रोल करतात.

शिवने याआधी एम टीव्हीवरील ‘रोडीज’ या शोमध्ये भाग घेतला होता. त्यानंतर तो ‘बिग बॉस’मुळे खूप चर्चेत आला होता. या शोमध्ये त्याचे आणि वीणा जगतापचे अफेअर खूप गाजले होते. शोमध्ये असताना त्यांनी सगळ्यांसमोर त्यांच्या प्रेमाचा खुलासा केला होता. तसेच एका टास्कमध्ये शिवने वीणाच्या नावाचा टॅटू काढला होता. तसेच घराच्या बाहेर आल्यानंतर वीणाने देखील त्याच्या नावाचा टॅटू काढला होता. परंतु अलीकडे त्यांच्या ब्रेकअपबाबत अनेक बातम्या समोर येत आहेत. तसेच वीणाने तिच्या हातावरील शिवच्या नावाचा टॅटू देखील हटवला आहे.

या शोमध्ये त्याने त्याच्या प्रेमळ आणि मनमिळावू स्वभावाने घरातील सदस्यांचे मन जिंकून घेतले होते. तसेच त्याने सगळ्या प्रेक्षकांचे देखील मन जिंकले होते. त्यामुळेच तो बिग बॉसच्या‌ दुसऱ्या पर्वाचा विजेता ठरला होता. मागील काही दिवसांपूर्वी त्याचे ‘शिलावती’ हे गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्याला प्रेक्षकांनी जोरदार प्रतिसाद दिला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मिठीत जाऊन तुझ्या मिटावे…’, स्पृहा जोशीच्या फोटोसोबत कॅप्शननेही वेधले चाहत्यांचे लक्ष

-देखणं रूप! हिरव्या बांगड्या, कपाळावर टिकली अन् पिवळी साडी नेसून राजेश्वरीने दिल्या नवरात्रीच्या शुभेच्छा

-बोल्ड ऍंड ब्यूटीफुल! सई ताम्हणकरच्या हॉटनेसने नेटकरी झाले पुरते वेडे; फोटोवर पडतोय लाईक्सचा पाऊस

हे देखील वाचा