मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सिद्धू अर्थातच सिद्धार्थ जाधवने आपल्या अभिनयाने लाखो- करोडो चाहत्यांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण केले आहे. आपल्या मजेशीर अभिनयाने प्रेक्षकांना खदखदून हसवण्याच्या बाबतीतही सिद्धार्थ कायमच आघाडीवर असतो. आज त्याला कोणत्याही परिचयाची आवश्यकता नाहीये. हा मराठमोळ्या अभिनेता सोशल मीडियावरही तितकाच सक्रिय असतो. नेहमीच तो स्वत: चे आणि कुटुंबासोबतचे फोटो, व्हिडिओ तसेच आपले अनुभव शेअर करत असतो. बुधवारी (२६ मे) सिद्धार्थच्या आई- वडिलांनी लग्नाचा ५० वा वाढदिवस साजरा केला. यादरम्यानचे फोटो त्याने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत. यासोबतच त्याने खास कॅप्शनही दिले आहे.
सिद्धार्थने आपल्या आई- वडिलांच्या ५० व्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त अधिकृत फेसबुक अकाउंटवर फोटो शेअर केले आहेत. यामध्ये त्याचे आई- वडील खुर्चीवर बसलेले दिसत आहेत. तसेच एका फोटोत सिद्धार्थही आपल्या आई- वडिलांसोबत दिसत आहे. या फोटोतून त्यांचे प्रेमही दिसत आहे.
सिद्धार्थने हे फोटो शेअर करत लक्षवेधी कॅप्शनही लिहिले आहे. त्याने लिहिले की, “सुखी संसाराची ५० वर्ष.. चि. रामचंद्र आणि चि.सौ.का. मंदाकिनी(तारा)… यांना लग्नाच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा…! २६ मे १९७१=२६ मे २०२१.”
https://www.facebook.com/100044357049699/posts/329026871919212/
सिद्धार्थच्या या पोस्टवर तब्बल ५ हजारांपेक्षा अधिक लाईक्स मिळाले आहेत. त्याचबरोबर सहाशेपेक्षाही अधिक कमेंट्स करून चाहत्यांनीही त्याच्या आई- वडिलांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षावही केला आहे. युजर्स ‘लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा काका काकू’, म्हणत कमेंट करत आहेत.
सिद्धार्थने यापूर्वीही मातृदिनानिमित्त आपल्या आईसोबत एक फोटो शेअर केला होता. त्या फोटोवरही चाहत्यांनी प्रतिक्रिया देत प्रेम व्यक्त केले होते.
सिद्धार्थने अनेक मराठी- हिंदी भाषिक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा जादू दाखवला आहे. त्याने आतापर्यंत ‘अगं बाई अरेच्छा’, ‘गोलमाल’, ‘जत्रा’, ‘जबरदस्त’, ‘बकुळा नामदेव घोटाळे’, ‘दे धक्का’, ‘उलाढाल’, ‘हुप्पा हुय्या’ यांसारख्या अनेक चित्रपटात काम केले आहे.
नुकताच ‘राधे: योर मोस्ट वाँटेड’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात सिद्धार्थनेही महत्त्वाची भूमिका साकारली आहे. सलमान खानच्या या चित्रपटात सिद्धार्थ जाधवव्यतिरिक्त मराठी अभिनेता, दिग्दर्शक प्रविण तरडेदेखील आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-