Wednesday, December 18, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण’, म्हणत सिद्धूने अमिताभ बच्चन यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

ज्यांनी त्यांच्या अभिनयाने अनेक दशकं गाजवली, असे ‘महानायक’ अमिताभ बच्चन सोमवारी (११ ऑक्टोबर) त्यांचा ७९ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यांच्या वाढदिवशी अनेक कलाकार तसेच त्यांचे चाहते सोशल मीडियावर त्यांच्या सोबतच्या आठवणी शेअर करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. बॉलिवूडमध्ये ज्या कलाकारांनी त्यांच्यासोबत काम केले आहे, त्या अनेक कलाकारांनी त्यांना वाढदिवसाच्या आणि दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच मराठी कलाकार देखील बिग बी यांना सोशल मीडियावर वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. अशातच आपला लाडका सिद्धू म्हणजेच अभिनेता सिद्धार्थ जाधव याने सोशल मीडियावर अमिताभ बच्चन यांच्यासोबतचा त्याचा फोटो शेअर करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सिद्धार्थने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून बिग बी यांच्यासोबत एक फोटो शेअर केला आहे. सिद्धूने एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये कोणत्यातरी कार्यक्रमाच्या मंचावर तो अमिताभ बच्चन यांना नमस्कार करताना दिसत आहे.  ( Marathi actor siddharth jadhav share a photo with amitabh bachchan and give best wishes on his birthday)

हा फोटो शेअर करून त्याने कॅप्शन दिले आहे की, “कलाकार म्हणून वाट्याला आलेला एक अविस्मरणीय क्षण. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा श्री. अमिताभ बच्चन सर. माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण.” या फोटोवर त्याचे अनेक चाहते प्रतिक्रिया देत आहेत. अनेकजण अमिताभ बच्चन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. तर एका चाहत्याने “नशीबवान आहात” अशी कमेंट केली आहे.

सिद्धार्थने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीला देखील अमिताभ बच्चन यांच्यासोबत फोटो शेअर करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यासोबत मराठी चित्रपटसृष्टीतून शरद केळकर, सोनाली खरे आणि स्वप्नील जोशी यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत फोटो शेअर करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अमिताभ बच्चन हे चित्रपटसृष्टीतील एक प्रतिभावान अभिनेते आहेत. तरुणपणापासून ते आज देखील ते जोमाने काम करतात. त्यांच्यातील जोश आणि उत्साह एखाद्या तरुणाला लाजवेल असा आहे. त्यांनी ‘शोले’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘बागबान’, ‘भूतनाथ’, ‘मोहाबते’ यांसारखे अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

नादच खुळा! अमिताभ बच्चन यांच्यासोबत सावलीप्रमाणे राहणाऱ्या बॉडीगार्डला मिळतो ‘इतका’ पगार; आकडा तर वाचा…

अमिताभ नव्हे, तर ‘या’ नावाने आई मारायची हाक; रेखा यांना सोडण्यामागे होते ‘हे’ मोठ्ठे कारण

सलमान खानने बहीण अर्पिताला लग्नात दिलं होतं ‘हे’ महागडं गिफ्ट, किंमत ऐकून तर फिरतील तुमचे डोळे

हे देखील वाचा