Wednesday, December 18, 2024
[aioseo_breadcrumbs]

सिद्धूने लाडक्या इरासोबतचा व्हिडिओ केला शेअर; ‘…इराला पप्पी’, म्हणत ‘या’ अभिनेत्रीकडून कौतुक

मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक अभिनेते आहेत. ज्यांच्याकडे आज नेम आणि फेम या दोन्ही गोष्टी आहेत. काहींना या जन्मताच वंश परंपरेने मिळाल्या आहेत, तर काहींनी त्या स्वतःच्या बळावर कमावल्या आहेत. असंच अभिनयाचा कोणताही वारसा नसलेला एक अभिनेता या चंदेरी दुनियेत उतरला. पाहायला गेलं तर हा प्रवास त्याच्यासाठी काही सोप्पा नव्हता. मात्र, अनेक अडचणींना सामोरे जाऊन संकटाशी दोन हात करून तो अभिनेता आज यशाच्या त्या शिखरावर पोहोचला आहे. जिथे आज त्याला लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सगळे ओळखतात. हा अभिनेता म्हणेज आपल्या सर्वांचा लाडका अभिनेता सिद्धार्थ जाधव. आपल्या विनोदी स्वभावाने त्याने आख्ख्या महाराष्ट्राला वेड लावले आहे. सिद्धू टीव्हीवर दिसला म्हणेज आजचा दिवस हसून-हसून लोटपोट होणार हे सर्वांनाच माहिती असते. सिद्धू हा आजकाल सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. त्याचे अनेक फोटो आणि व्हिडिओ तो शेअर करत असतो. अशातच त्याच्या मुलीसोबत त्याचा एक व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

सिद्धार्थने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून त्याची मुलगी इरासोबत एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ते दोघेही गाडीमध्ये बसलेले आहेत. ते दोघेही सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असणाऱ्या ‘बस मोहब्बत है आप से’ या डायलॉगवर हावभाव करताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये सिद्धार्थने निळ्या रंगाचे जॅकेट घातले आहे. तसेच डोळ्यांवर चष्मा लावलेला आहे, तर इराने पिवळ्या रंगाचा टी-शर्ट घातला आहे. हा गोड व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या बापलेकीची जोडी सर्वांना खूप आवडत आहे.

हा व्हिडिओ शेअर करून त्याने “मोहब्बत है आप से, लव्ह यू इरा, बाप लेकीची मज्जा,” असे लिहिले आहे. त्यांच्या या व्हिडिओवर सातत्याने कमेंट येत आहेत. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने “कसला गोड झालाय हा व्हिडिओ, इराला पप्पी,” अशी कमेंट केली आहे. त्याच्या एका चाहत्याने “किती गोड रे तुझं पिल्लू, अशी कमेंट केली आहे. दुसऱ्या एका चाहत्याने “लई भारी,” अशी कमेंट केली आहे. (marathi actor siddharth jadhav share a video with his daughter ira on social media)

सिद्धार्थ हा मराठी चित्रपटसृष्टीतील एक आघाडीचा अभिनेता आहे. त्याने त्याच्या करिअरमध्ये अनेक चित्रपटात काम केले आहे. त्याने ‘जत्रा’, ‘दे धक्का’, टाइम प्लिज, ‘खो खो’, ‘प्रियतमा’, ‘येरे येरे पैसा’, ‘ढोलकी’, ‘शिकारी’, ‘माझा नवरा तुझी बायको’, ‘फक्त लढा म्हणा’ यांसारख्या अनेक मराठी चित्रपटात काम केले आहे. यासोबत त्याने हिंदीमध्ये ‘गोलमाल रिटर्न्स’, ‘सिटी ऑफ गोल्ड’, ‘राधे’, ‘सिंबा’ या चित्रपटात काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘पप्पी दे पप्पी दे पारुला’, म्हणत आख्ख्या महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या स्मिताचा ग्लॅमरस लूक आला समोर

-शिवानी बावकर ‘या’ मालिकेतून येणार प्रेक्षकांच्या भेटीला; एकता कपूर करणार निर्मिती

-‘…खोटं वाटतं, बरं तुझी शप्पथ’, प्राजक्ता माळीच्या सुंदर फोटोवरील चाहत्याची कमेंट चर्चेत

हे देखील वाचा