Wednesday, December 18, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘आपला सिद्धू नुसता जोश’, सिद्धार्थने शेअर केलेल्या व्हिडिओवर चाहत्यांनी पाडला कमेंट्सचा पाऊस

मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वांचा लाडका अभिनेता आपला सिद्धू म्हणजेच सिद्धार्थ जाधव होय. आपल्या अभिनयाच्या आणि विनोदाच्या शैलीने त्याने प्रेक्षकांच्या मनात त्याचे एक अढळ स्थान निर्माण केले आहे. आजकाल सिद्धू सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. त्याचे तसेच त्याच्या कुटुंबासोबतचे अनेक फोटो तो सोशल मीडियावर शेअर करत असतो. आजकाल सिद्धार्थच्या अभिनयासोबत त्याच्या स्टाईलचे देखील लाखो फॅन बनत आहेत. त्याच्या अनेक वेगवेगळ्या स्टाईल सोशल मीडियावर पाहायला मिळतात. अशातच सोशल मीडियावर त्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

सिद्धार्थने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून त्याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, तो गाडी चालवताना गाण्यांचा आनंद घेताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये त्याने टी-शर्ट घातला आहे. डोक्यावर लाल रंगाची टोपी घातली आहे, तर डोळ्यांवर पिवळ्या रंगाचा चष्मा लावला आहे. त्याच्या गाडीमध्ये ‘पुन्हा पावसाला सांगायचे’ हे गाणे लागले आहे.

हा व्हिडिओ शेअर करून त्याने “पुन्हा पावसाला सांगायचे,” हे कॅप्शन दिले आहे. त्याच्या या व्हिडिओवर त्याचे अनेक चाहते नेहमी प्रमाणेच जोरदार कमेंटसचा वर्षाव करत आहेत. त्याचा हा दिलखुलासा जगण्याचा फंडा त्याच्या चाहत्यांना नेहमीच आवडतो. त्याच्या या व्हिडिओवर एका चाहत्याने “छान दादा,” अशी कमेंट केली आहे. दुसऱ्या एका चाहत्याने “आपला सिद्धू नुसता जोश,” अशी कमेंट केली आहे. तसेच बाकी अनेक चाहते व्हिडिओवर कमेंट करत आहेत.

सिद्धार्थ हा मराठी चित्रपटसृष्टीतील एक आघाडीचा अभिनेता आहे. त्याने त्याच्या करिअरमध्ये अनेक चित्रपटात काम केले आहे. त्याने ‘जत्रा’, ‘दे धक्का’, टाइम प्लिज, ‘खो खो’, ‘प्रियतमा’, ‘येरे येरे पैसा’, ‘ढोलकी’, ‘शिकारी’, ‘माझा नवरा तुझी बायको’, ‘फक्त लढ म्हणा’ यांसारख्या अनेक चित्रपटात काम केले आहे. यासोबत त्याने हिंदीमध्ये ‘गोलमाल रिटर्न्स’, ‘सिटी ऑफ गोल्ड’, ‘राधे’, ‘सिम्बा’ या चित्रपटात काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘गीता माँ’ने लावली स्टेजवर आग; पाहून शिल्पाही झाली दंग, म्हणाली, ‘हा परफॉर्मन्स पाहिल्यानंतर गीताला…’

-हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर पहिल्यांदा दिसल्या सायरा बानो; हातात होता दिलीप कुमारांचा फोटो

-कोव्हिडमधून बरे झाल्यानंतर ‘अशी’ झाली होती रुबीनाची हालत; म्हणाली, ‘मी पुन्हा ५० किलो वजन…’

हे देखील वाचा