Wednesday, December 18, 2024
[aioseo_breadcrumbs]

प्रेक्षकांना हसविण्यासाठी सिद्धू सज्ज, ‘बिग बॉस मराठी ३’च्या होस्टिंगला हातभार लावून शोला लावले ‘चार चाँद’

‘बिग बॉस मराठी ३’ चे ग्रँड प्रिमिअम या वर्षी दणक्यात झाले आहे. शोमध्ये विविध क्षेत्रातील लोकं स्पर्धक म्हणून आले आहेत. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील महेश मांजरेकर हा शो होस्ट करत आहेत. त्यांची तब्येत नाजूक असल्याने, ते या वर्षी हा शो होस्ट करतील की नाही याबाबत अनेक प्रश्न चिन्ह उभी राहिली होती. पण त्यांच्या आगमनाने बिग बॉस प्रेमी आनंदात आहेत. या वर्षी शोची सुरुवात एकदम दणक्यात झाली आहे. याचे आणखी एक कारण म्हणजे महाराष्ट्राचा लाडका अभिनेता सिद्धार्थ जाधव, याने होस्टिंगला हातभार लावून या शोला चार चाँद लावले आहेत. तसेच त्याच्या विनोदी स्वभावाने त्याने सगळे वातावरण हलके फुलके केले आहे.

सिद्धार्थने त्याच्या विनोदी स्वभावाने नेहमीप्रमाणेच सगळ्यांना हास्याच्या महासागरात नेऊन ठेवले आहे. या शोच्या ग्रँड प्रिमिअममध्ये तो पुशअप्स तसेच बेली डान्स करताना दिसला आहे. ‘बिग बॉस मराठी ३’ च्या घरात बॉडी बिल्डर जय दुधाने आणि मीनल शाह यांची दमदार एन्ट्री झाली. त्याच्या एन्ट्रीनंतर सिद्धार्थने त्याच्या विनोदी स्टाईलने सर्वांना खूप हसवले आहे. (Marathi actor siddharth jadhav’s comedy act on bigg Boss Marathi 3 grand premium)

सिद्धार्थने सुरुवातीला जयला पाठीवर टायर घेऊन पुशअप्स मारायला सांगितले. यानंतर तो महेश मांजरेकर यांना म्हणाला की, “मी या पेक्षाही मोठा टायर घेऊन पुशअप्स मारू शकतो.” नंतर तो बॅक स्टेजला जातो आणि एक छोटा टायर घेऊन येतो आणि मजेशीर पद्धतीने पुशअप्स मारतो. तसेच तो मीनलसोबत बेली डान्स करताना देखील दिसला आहे. या सगळ्या त्याच्या विनोदाने प्रेक्षकांना खूप आनंद झाला आहे. तसेच या एपिसोडच्या शेवटी महेश मांजरेकर यांनी सांगितले की, ते त्याला दर विकेंडला बोलवणार आहेत. त्यामुळे आता विकेंड खूपच मस्तीने भरलेला आणि धमाकेदार असणार आहे यात काही शंकाच नाही.

बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वात विविध क्षेत्रातील लोकांची एन्ट्री झाली आहे. या शोमध्ये सोनाली पाटील, विशाल निकम, स्नेहा वाघ, उत्कर्ष शिंदे, मिरा जगन्नाथ, तृप्ती देसाई, आविष्कार दारव्हेकर, सुरेखा कुडची, गायत्री दातार, विकास पाटील, ह.भ.प. शिवलिला पाटील, जय दुधाने, मीनल शाह, अक्षय वाघमारे, संतोष चौधरी अशा एकूण पंधरा स्पर्धकांची एन्ट्री झाली आहे. आता हे सगळे स्पर्धक बिग बॉसमध्ये काय धमाल करणार आहेत, हे पाहण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘बिग बॉस मराठी ३’ मध्ये स्पर्धकांचे झाले दणक्यात स्वागत, आहेत लोकप्रिय कलाकार

-‘बिग बॉस मराठी ३’च्या ग्रँड प्रीमियरला सुरुवात, ‘सिद्धू’ करतोय होस्टिंग, तर ‘या’ दोन स्पर्धकांची एन्ट्री

-गुलाबी रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये अन्विता दिसतेय एकदम ‘बार्बी डॉल’, कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव

हे देखील वाचा