Friday, April 25, 2025
Home मराठी अरेरे! गाढ झोपी गेलेल्या मितालीसोबत ‘हे’ काय करतोय सिध्दार्थ चांदेकर, व्हिडिओ होतोय व्हायरल

अरेरे! गाढ झोपी गेलेल्या मितालीसोबत ‘हे’ काय करतोय सिध्दार्थ चांदेकर, व्हिडिओ होतोय व्हायरल

मराठी सिने जगतात असे अनेक कलाकार आहेत जे त्यांच्या अभिनयाइतकेच सोशल मीडियावरही चांगलेच प्रसिद्ध असतात. सोशल मीडियावरील त्यांचे रिल्स आणि फोटो जोरदार व्हायरल होत असतात. याच सोशल मीडियावर नेहमी चर्चेत येणाऱ्या जोडीमध्ये मिताली मयेकर आणि सिद्धार्थ चांदेकरच्या नावाचा समावेश होतो. सोशल मीडियावर त्यांचे फोटो आणि व्हिडिओ नेहमीच व्हायरल होताना दिसत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये अभिनेता सिध्दार्थ चांदेकरने झोपलेल्या मितालीची चांगलीच चेष्टा केल्याचे दिसत आहे. काय आहे हा व्हिडिओ चला जाणून घेऊ. 

मिताली मयेकर आणि सिध्दार्थ चांदेकर हे मराठी सिनेसृष्टीतील क्यूट कपल म्हणून ओळखले जाते. त्यांच्या या गोड जोडीचे असंख्य चाहते सोशल मीडियावर पाहायला मिळत असतात. सिध्दार्थ आणि मिताली आपल्या अभिनयाइतकेच सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असतात. ज्यावरुन ते त्यांचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात. सध्या या जोडीचा एक मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडिओमध्ये मिताली मयेकरची गाडीमध्ये गाढ झोप लागलेली दिसत आहे. तर तिच्या शेजारी बसलेल्या सिध्दार्थ चांदेकरने तिची मजा घेण्याची ठरवत भन्नाट रिल केले आहे. सिध्दार्थने मितालीसोबत ड्यूट करत “आमची पहिले डयूट गाणे,ज्यामध्ये माझ्या बायकोने सर्वोत्तम कामगिरी केल्याचे दिसत आहे,” असे म्हणले आहे. सध्या सिध्दार्थ चांदेकरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे ज्यावर नेटकऱ्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्याचबरोबर सिने कलाकारांनीही या व्हिडिओवर जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

 

 

दरम्यान अभिनेता सिध्दार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर जितके एकमेकांची टिंगल करतात तितकी त्यांची लवस्टोरीही गोड आहे. त्यामुळेच त्यांच्या या जोडीचे चाहते नेहमीच कौतुक करताना दिसत असतात.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हे देखील वाचा