Thursday, December 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘संत तुकाराम महाराज माझ्याकडे 22 वेळा आले’, भलताच चर्चेत असलेल्या सुबोध भावेचं वक्तव्य

मागील काही दिवसांपासून ‘हर हर महादेव‘ हा सिनेमा आणि अभिनेता सुबोध भावे चांगलाच चर्चेत आहे. या सिनेमात त्याने छत्रपती शिवाजी महाराजांची व्यक्तिरेखा रेखाटली आहे. विशेष म्हणजे, हा सिनेमा छोट्या पडद्यावर 18 डिसेंबर रोजी रिलीजही झाला. यानंतर शिवभक्तांनी कोल्हापूर येथे सुबोध भावेची भेट घेतली. या सिनेमातील काही गोष्टींवरून वाद निर्माण झाल्यामुळे ते काढून टाकण्याची मागणी शिवभक्तांकडून करण्यात आली होती. अशात, सुबोध भावेविषयी आणखी एक माहिती समोर आली आहे.

सुबोध भावे साकारणा संत तुकाराम महाराजांवर आधारित सिनेमात काम
अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) याने शिवभक्तांशी बोलताना संत तुकाराम महाराज (Sant Tukaram Maharaj) यांच्यावर सिनेमा करणार असल्याचे सांगितले आहे. अभिनेता म्हणाला आहे की, “मी संत तुकाराम महाराज यांच्यावर सिनेमा करतोय. संत तुकाराम महाराज माझ्याकडे 22 वेळा आले. माझा पहिला सिनेमा हा संत तुकाराम महाराज यांच्यावरच होता. मात्र, काही कारणास्तव तो सिनेमा रिलीज होऊ शकला नाही.”

‘बापजन्मात करणार नाही ऐतिहासिक बायोपिक’
‘हर हर महादेव’ (Har Har Mahadev) सिनेमाविषयी शिवभक्तांसोबत बोलताना अभिनेत्याने पुन्हा कधीच ऐतिहासिक बायोपिक करणार नाही अशी घोषणा केलेली. तो म्हणाला होता की, “माझे छत्रपती शिवाजी महाराजांवरील प्रेम हे आयुष्यभर राहील. मला त्यांच्या सिनेमातून जे काही मिळाले, ते मी मरेपर्यंत करत राहील. मात्र, आता इथून पुढे ऐतिहासिक सिनेमातील कुणाचीही व्यक्तिरेखा बापजन्मात करणार नाही. सध्या शूटिंग सुरू असलेला माझा बायोपिक सिनेमा हा शेवटचा असेल.”

सुबोध भावे तुकाराम महाराजांची व्यक्तिरेखा ज्या सिनेमात साकारणार आहे, तो सिनेमा हिंदी आहे. त्या सिनेमाचे लेखन आणि दिग्दर्शन हे ओम वैद्य करत आहेत. महत्त्वाचं म्हणजे, यावर्षी मे 2022मध्ये या सिनेमाची घोषणा झाली होती.

सुबोध भावेचे मालिका आणि सिनेमे
सुबोध भावे याने मालिका आणि अनेक सिनेमात काम केले आहे. त्यामध्ये ‘तुला पाहते रे’, ‘बस बाई बस लेडीज स्पेशल’, ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’, ‘विजेता’, ‘बालगंधर्व’, ‘सविता दामोदर परांजपे’, ‘कट्यार काळजात घुसली’, ‘फुगे’, ‘पुष्पक विमान’, ‘तुला कळणार नाही’, ‘अश्रूंची झाली फुले’ यांसारख्या मालिका आणि सिनेमांचा समावेश आहे. (marathi actor subhodh bhave will be play sant tukaram maharaj role in hindi movie read here)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
आतल्या गोटातील खबर! सलमानमुळे ‘हा’ दिग्दर्शक पडणार कठीण काळातून बाहेर, केलीय हातमिळवणी?
‘तुझ्याच्याने होणार नाही’, सुंदर पिचाईंना ‘हे’ तीन प्रश्न विचारताच अक्षय कुमारची पत्नी नेटकऱ्यांकडून ट्रोल

हे देखील वाचा