आपली मराठमोळी संस्कृती विविध प्रथा, परंपरा, रीती, रिवाज, पद्धती आदी सर्वच गोष्टींनी समृद्ध आणि वैविध्य आहे. आपल्या या मराठी संस्कृतीमध्ये प्रत्येक गोष्टीसाठी आपल्या पूर्वजांनी काही परंपरा तयार केल्या आहे. आजच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या आयुष्यात अनेकदा आपण त्या सर्व गोष्टींकडे कानाडोळा करतो आणि पुढे जातो. मात्र आधुनिक विचारांची इंडस्ट्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मनोरंजन विश्वात जेव्हा आपल्या जुन्या परंपरा, रीती पाळताना कलाकरांना पाहिले जाते तेव्हा नक्कीच सर्वांना आश्चर्य तर वाटते मात्र आनंदही तितकाच होतो.
काही दिवसांपूर्वीच मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेता असणाऱ्या सुयश टिळकने आणि अभिनेत्री आयुषी भावासोबत लगीनगाठ बांधली. त्यांचे लग्न, लग्नाच्या चर्चा आणि या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. मराठी मनोरंजनइंडस्ट्रीमधील गाजलेल्या लग्नांमध्ये नक्कीच सुयश आणि आयुषीचे लग्न सामील होईल. यांच्या लग्नाने सोशल मीडियावर मोठा बज निर्माण केला होता.
लग्नानंतर आपल्याकडे देवदर्शन घेण्याची पद्धत आहे. सुयश आणि आयुषीने देखील त्यांच्या लग्नानंतर ज्योतिबा आणि जेजुरीला जाऊन ती परंपरा पाळली आहे. २१ ऑक्टोबर रोजी विवाहबंधनात अडकलेल्या सुयश आणि आयुषीने सर्वात आधी ज्योतिबाचे दर्शन घेतले आणि आता ते अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीला पोहचले आहे. आयुषीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून जेजुरीचे अनेक फोटो शेअर केले आहेत. जेजुरीला लग्नानंतर पहिल्यांदा गेल्यावर पत्नीला उचलून न्यावे लागते अशी पद्धत आहे. यानुसार सुयशने देखील आयुषीला उचलून गडाच्या पायऱ्या चढल्या. याचाच एक व्हिडिओ देखील आयुषीने शेअर केला आहे. यावेळी हे दोघे त्यांच्या कुटुंबासोबत दिसले. दोघानींनी पिवळ्या रंगाचे कपडे घातले होते.
यावेळी या दोघांनी मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन दर्शन तर घेतले शिवाय जेजुरीच्या गडावर असणारी अतिशय जुनी अशी खंडा तलवार देखील उचलली होती. त्यांच्या या फोटोंवर फॅन्ससोबतच कलाकार देखील कमेंट्स करताना दिसत आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-