Friday, April 25, 2025
Home मराठी श्श्श्श! स्वप्निल जोशी अभिनित ‘बळी’ चित्रपटाचा टिझर रिलीझ, पाहून तुम्हालाही फुटेल घाम

श्श्श्श! स्वप्निल जोशी अभिनित ‘बळी’ चित्रपटाचा टिझर रिलीझ, पाहून तुम्हालाही फुटेल घाम

मराठी चित्रपटसृष्टीतील महागडा अभिनेता म्हणून स्वप्निल जोशीला ओळखले जाते. त्याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे. त्याने साकारलेल्या भूमिका आजही चाहत्यांच्या मनात तशाच आहेत. आता स्वप्निल पुन्हा एकदा नवीन चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाच्या नवीन पोस्टरचे काही दिवसांपूर्वी अनावरण करण्यात आले होते. आता याचा टिझरही रिलीझ झाला आहे. टिझर पाहून तुम्हालाही घाम फुटेल.

या नवीन चित्रपटाचे नाव ‘बळी’ असे आहे. स्वप्निल या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. स्वप्निलने या चित्रपटाचा टिझर आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. यामध्ये त्याने लिहिले आहे की, “बळी टीझर… घाबरू नका. १६ एप्रिल पासून, तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात.” या टिझरवरून असे दिसते की, हा एक भयपट आहे.

यापूर्वी या चित्रपटाचा पोस्टर शेअर करण्यात आला होता. यामध्ये स्वप्निल रक्ताने माखलेला दिसत आहे. तसेच त्याच्या गळ्याभोवती जखमी हातही दिसत आहे. स्वप्निलचा गळा पकडणाऱ्या व्यक्तीचा हात जरी दिसत नसला, तरीही हा चित्रपट खूपच भयावह असल्याचे दिसते. स्वप्निलचा हा लूक पाहून भल्या भल्यांना भीतीने घाम फुटल्याशिवाय राहणार नाही. याव्यतिरिक्त या पोस्टरमध्ये ‘कोण आहे एलिझाबेथ?’ हा प्रश्नही दिसत आहे.

यापूर्वी चित्रपटाचे पोस्टर शेअर करत स्वप्निलने लिहिले होते की, “एलिझाबेथच्या जाळ्या मधून कोणीही सुटू शकत नाही. पण कोण आहे एलिझाबेथ? जाणून घ्या ‘बळी’ मध्ये, येत आहे १६ एप्रिलला तुमच्या जवळच्या सिनेमागृहात.” स्वप्निलच्या या पोस्टरवर अभिनेता जितेंद्र जोशी आणि निर्माता आदित्य सरपोतदार यांनीही कमेंट करत चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

या चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य फुरिया हे आहेत. या चित्रपटाची निर्मिती अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशाणदार यांनी केली आहे. या चित्रपटात अभिनेत्री पूजा सावंत आणि समर्थ जाधव हे कलाकारही झळकणार आहेत.

स्वप्निलने आतापर्यंत अनेेक हिट चित्रपट दिले आहेत. त्यामध्ये ‘मुंबई पुणे मुंबई’, ‘मुंबई पुणे मुंबई २’, ‘दुनियादारी’, ‘तू ही रे’, ‘मितवा’ यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-ओह माय गॉड! ४८ वर्षीय मंदिरा बेदीने केलं बिकिनीमध्ये वर्कआऊट, एकदा नजर टाकाच

-गदरमध्ये ज्याने सनी-अमिषाच्या मुलाची भूमिका केली आता तोच होणार गदर दोनचा हिरो, पाहा कोण आहे ‘तो’

-लग्नाच्या वाढदिवसाचे औचित्य साधून स्मृती इराणींनी हटके अंदाजात दिल्या पतीला शुभेच्छा

हे देखील वाचा