Monday, July 1, 2024

मराठी विरुद्ध दाक्षिणात्य चित्रपटांबद्दल स्वप्निल जोशी स्पष्टच म्हणाला, ‘मराठी चित्रपटांना स्क्रीनिंग मिळणं हाच…’

मराठी सिनेसृष्टीमधील चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जाणारा प्रसिद्ध अभिनेता स्वप्निल जोशी हा इंडस्ट्रीमधील आघाडीचा कलाकार आहे. त्याने चित्रपटच नाहीत तर वेबसिरिज, नाटक, अशा वेगवेळ्या माध्यमांमध्ये अपल्या दमदार अभिनयाचा ठसा उमटवला आहे. स्वप्निल अभिनयासोबतच सोशल मीडियावरही खूप सक्रिय असतो त्याशिवाय तो नेहमी परखड मत मांडत असतो. अशातच स्वप्निलने मराठी सिनेमांवर आपलं मात मांडलं आहे ज्यामुळ अभिनेत्याेन चाहत्यांचे लक्ष वेधलं आहे.

चॉकलेट बॉय स्वप्निल जोशी (Swapnil Joshi) याने सध्या मनोरंजनामध्ये चित्रपटांच्या स्थितीबद्दल आपलं मत मांडलं आहे. दाक्षिणात्य चित्रपटांमुळे बॉलिवू आणि मराठी इंडस्ट्री मागे पडत आहे. किंवा प्रेक्षकांना साउथ चित्रपटांचीच भुरळ लागली आहे. ज्यामुळे मराठी चित्रपटांचा चाहतावर्ग कमी झाला आहे असं अनेकांना वाटतं. त्याशिवाय हे काही सरासरीने योग्य आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. अशातच स्वप्निलला एका मुलाखतीदरम्यान मराठी भाषेतील चित्रपट विरुद्ध दाक्षिणात्य चित्रपट याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्याबरोबरच त्याला मराठी चित्रपटसृष्टीच्या सध्याच्या स्थितीबद्दलही मत विचारण्यात आले.

त्यावेळी स्वप्निलने सांगितले की, “मराठी प्रेक्षकांचा मराठी चित्रपटांकडे आणि इतर भाषेतील चित्रपटांकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगवेगळा आहे. प्रेक्षक मराठी चित्रपटांसाठी वेगवेगळे निकष लावतात. जे प्रेक्षक दुसऱ्या भाषेतील चित्रपटाचं कौतुक करतात, तसाच चित्रपट मराठीत बनवला तर तो प्रेक्षकांना पचनार नाही.”

 

View this post on Instagram

 

स्वप्निल पुढे म्हणाला की, “दुसऱ्या चित्रपटांच्या संवादात त्यांना शिवीगाळ वगैरा चालतं मात्र, तेच जर मराठी चित्रपटांमध्ये केलं तर अनेकांच्या भुवया उंचावतात आणि भावणा दुखावल्या जातात. मराठी सिनेविश्व हा विषय खूप व्यापक आहे. थोडक्यात याचं उत्तर देणं कठीण आहे. पण महाराष्ट्रात मराठी चित्रपटाला स्क्रीन्स मिळाव्यात हा आग्रह धरावा लागतो. हाच मुळात विचार करण्याचा विषय आहे. कोणत्याही कलेत चांगलं हा सापेक्ष भाव आहे. एखाद्याला एखादा चित्रपट आवडेल तर दुसऱ्याला तो कदाचित आवडणार नाही. त्यामुळे प्रेक्षकांनी प्रत्येक चित्रपट पाहून आपल्या आवडीनुसार चित्रपटाला दुजोरा द्यायला हवा. सरासरी पाहता सर्व भाषिक चित्रपटांची स्थिती सारखीच आहे. हिंदीतही तीनशे चित्रपट बनतात पण त्यातील पाच प्रचंड चालतात. दाक्षिणात्य राज्यांमधील निवडक चित्रपटच प्रेक्षक डोक्यावर घेतात. मराठीतही असंच चित्र आहे.”

स्वप्निलने या मुलाखतीदरम्यान मराठी चित्रपटांना स्क्रीनिंगही मिळत नाही हा मुद्दा देखिल काढला जी नेहीम मराठी इंडस्ट्रीसाठी मोठी शोकांतिका आहे. सध्या अभिनेता त्याच्या वाळवी चित्रपटामुळे खूप चर्चेत आला आहे. त्याशिवाय स्वप्निलने साकारलेल्या भूमिकेचे प्रचंड कौतुकही होत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
‘बिग बॉस’ फेम मीरा जगन्नाथच्या नवीन कारचा भीषण अपघात, घडला प्रकार जाणून घ्याच
नसीरुद्दीन शाह यांनी त्याच्या ‘या’ सिनेमात अक्षय कुमारकडून करून घेतली होती नाकघासणी

हे देखील वाचा