Wednesday, July 2, 2025
Home मराठी ‘न्यू कॅरेक्टर, न्यू जर्नी’, उमेश कामतने दाखवली आगामी चित्रपटाची झलक, पाहायला मिळाला अनोखा अंदाज

‘न्यू कॅरेक्टर, न्यू जर्नी’, उमेश कामतने दाखवली आगामी चित्रपटाची झलक, पाहायला मिळाला अनोखा अंदाज

आजकाल अनेक मोठे कलाकार छोट्या पडद्यावर पदार्पण करताना दिसत आहेत. प्रेक्षकांचे आवडते कलाकार दररोज त्यांना भेटायला त्यांच्या घरी येतात त्यामुळे त्यांच्यामध्ये देखील आनंदाचे वातावरण आहे. अशातच सोनी मराठीवरील ‘अजूनही बरसात आहे’ ही मालिका चांगलीच लोकप्रिय ठरत आहे. या मालिकेत मुख्य भूमिकेत प्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि उमेश कामत दिसत आहेत.

प्रेम करणारी दोन माणसे एकेमकांपासून दुरावून अनेक वर्षांनी एकत्र भेटतात. ही सुंदर कहाणी या मालिकेत दाखवली आहे. उमेश आणि मुक्ता यांनी अनेक चित्रपटात काम केले आहे. त्यांची फॅन फॉलोविंग देखील तेवढी जास्त आहे. त्यामुळे आता त्यांच्या या मालिकेला चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसत आहे. अशातच उमेशने सोशल मीडियावर त्याच्या आगामी चित्रपटातील त्याचा नवीन लूक शेअर केला आहे. यासोबत चित्रपटात त्याच्यासोबत असणाऱ्या कलाकाराची देखील झलक दाखवली आहे. (Marathi actor umesh kamat share her upcoming movies photos on social media)

काही दिवसांपूर्वी उमेशने श्रुती मराठे आणि मधुरा वेलणकर यांच्यासोबत एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. हा फोटो शेअर करून त्याने लिहिले होते की, “ही श्रुती मराठे, मी उमेश! माझ्या डाव्या बाजूला आहे मधुरा वेलणकर मागे दिसतोय तो अतुल परचुरे आणि माझा मेकअप ज्याने केलाय तो गणेश.” यासोबत त्याने अलिबाबा आणि चाळिशीतील चोर असे लिहिले आहे. तसेच त्याने नुकताच सायकलवरील फोटो शेअर केले आहेत. हा फोटो शेअर करून त्याने “नवीन पात्र, नवीन प्रवास” असे कॅप्शन दिले आहे.

उमेशच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘अलिबाग आणि चाळिशीतील चोर’ असे आहे. या चित्रपटाबाबत आणखी जास्त कोणतीच माहिती समोर आली नाही. पण उमेशने त्याचे हे फोटो शेअर करून चित्रपटातील त्याच्या व्यक्तीरेखेबद्दल साधारण माहिती दिली आहे. त्याचे चाहते त्याचा हा नवीन चित्रपट पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत.

उमेश हा मराठी चित्रपटसृष्टीतील एक आघाडीचा प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने अनेक मराठी चित्रपटात, मालिकांमध्ये तसेच नाटकात काम केले आहे. त्याने ‘बाळकडू’, ‘ये रे ये रे पैसा’, ‘लग्न पहावे करून’ अशा अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

बॉलिवूडचे ‘हे’ मोठे सिनेमे ठरले नुसताच फुसका बार, कमाईतून बजेट वसूल करणे देखील झाले मुश्किल

बॉलिवूडच्या ‘या’ दिग्गज अभिनेत्रींनी लग्नानंतर त्यांच्या यशस्वी चित्रपटांच्या करिअरला ठोकला रामराम

प्रायव्हेट जेटमध्ये मांडी घालून बसलेल्या प्रियांका चोप्राचा फोटो व्हायरल, नेटकरी म्हणाले, ‘खरी देसी गर्ल’

हे देखील वाचा