विघ्नहर्ता, गणेशा, एकदंत, वक्रतुंड, लंबोदर, गणपती, विनायक अशा कितीतरी नावांनी ओळखल्या जाणाऱ्या आपल्या सर्वांच्या लाडक्या बाप्पाचे आज घराघरात आगमन झाले. श्रींच्या येण्याने सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. आम पासून खासपर्यंत सर्वच जणं बाप्पांच्या सेवेत मग्न झालेले दिसत आहे. याला मराठी सिनेसृष्टीतील कलाकारसुद्धा अपवाद नाही. मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांच्या घरात आज गणपतीची स्थापना झाली आहे. चला तर कलाकारांच्या घरातील बाप्पांचे दर्शन घेऊया.
‘काहे दिया परदेश’ फेम अभिनेत्री सायली संजीव हिच्या घरात गणेशाचे आगमन झाले आहे. तिने तिच्या घरातील बाप्पाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिने अगदी साध्या मात्र आकर्षक पद्धतीने बाप्पाची स्थापना केली आहे. या फोटोमध्ये ती बाप्पासोबत दिसत असून, फोटोमध्ये साडीत दिसणारी सायली खूपच सुंदर दिसत आहे.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने देखील तिच्या बाप्पासोबत सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने खूप सुंदर बाप्पाचा देखावा केला आहे. तसेच सोनाली देखील खूप सुंदर दिसत आहे. तिने साडी नेसलेली आहे. सोनालीने बाप्पाची मूर्ती बनवताना देखील व्हिडिओ शेअर केला होता.
बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वाचा विनर शिव ठाकरे याच्या घरी देखील गणपतीचे आगमन झाले आहे. त्याने बाप्पासोबत फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये शिवने केशरी रंगाचा कुर्ता घातला असून, डोक्याला गणपती बाप्पा मोरया असे लिहिलेली पट्टी बांधली आहे. त्याच्या घरातील मूर्ती खूप सुंदर आणि रेखीव दिसत आहे.
‘माझा होशील ना’ फेम गौतमी देशपांडे हिच्या घरात देखील गणपतीची स्थापना झाली आहे. तिने अत्यंत साध्या पद्धतीने आरास केली आहे. तिने फुलांनी बाप्पाची आरास केली असून, फुलांनीच रांगोळी काढली आहे. फोटोमध्ये ती देखील खूप सुंदर दिसत आहे. तिने चॉकलेटी रंगाची साडी नेसलेली आहे.
क्रांती रेडकरने तिच्या घरातील बाप्पासोबत काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये क्रांती लाल रंगाच्या कुर्त्यामध्ये दिसत आहे. तसेच घरातील बाप्पाची आरास देखील अगदी साध्या मात्र लक्षवेधी पद्धतीने केली आहे. हे फोटो शेअर करून तिने गणपती बाप्पा मोरया आहे असे कॅप्शन दिले आहे.
अभिनेता संतोष जुवेकरने त्याच्या घरात गणपतीची स्थापना केली आहे. त्याच्या घरातील गणपतीचे फोटो देखील समोर आले आहेत. या फोटोमध्ये त्याने पारंपरिक वेशभूषा केली असल्याचे दिसत असून, त्याने धोती नेसली आहे. फोटोमध्ये तो आरती करताना दिसत आहे.
अभिनेता पुष्कर जोगच्या घरी बाप्पाचे आगमन झाले आहे. त्याने त्याच्या घरच्या बाप्पासोबत एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून, या व्हिडिओमध्ये त्याच्यासोबत त्याची पत्नी आणि मुलीसोबत दिसत आहे. ते सगळ्यांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देत आहेत.
रुपाली भोसले हिच्या घरी देखील गणपतीचे आगमन झाले आहे. तिने तिच्या बाप्पासोबत एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून, या व्हिडिओमध्ये ती तिच्या कुटुंबासोबत दिसत आहे. साडी नेसलेली रुपाली खूप सुंदर दिसत आहे. तसेच तिच्या घरातील देखावा देखील खूप सुंदर दिसत आहे.
आता पुढील दहा दिवस संपूर्ण वातावरण भक्तिमय आणि जल्लोषाचे असणार आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-श्वास रोखून धरा! रजनीकांत यांच्या ‘अन्नाथे’ चित्रपटाचा फर्स्ट लूक आला समोर; ‘या’ दिवशी होणार रिलीझ
-क्रिकेटमधील ‘दादा’ गाजवणार सिनेमाचं मैदान; झालीय सौरव गांगुलीच्या बायोपिकची घोषणा
-‘घर की मुर्गी दाल बराबर!’ माधुरी दीक्षितने स्वतः लाच का दिली असेल ही उपमा?