Saturday, July 6, 2024

‘हा बोल दे तू’ म्हणणाऱ्या उमेशच्या कानात श्रुती मराठेचा जोरदार ‘हा’, त्यांचा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

सोशल मीडिया आणि कलाकार हे अगदी जवळचे समीकरण आहे. कलाकार सातत्याने सोशल मीडियावर त्यांचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात. त्यांचा चाहता वर्ग देखील त्यांच्या पोस्टला भरभरून प्रतिसाद देत असतो. अशातच मराठी इंडस्ट्रीमधील लोकप्रिय कलाकार श्रुती मराठे आणि उमेश कामत यांचा एक मजेशीर व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

श्रुतीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तिच्यासोबत उमेश कामत दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, उमेश अगदी रोमँटिक अंदाजात गाणे म्हणत असतो. तो म्हणतो की, ‘हा बोल दे तू’ यावर श्रुती त्याच्या कानात मोठ्याने ‘हा’ असे ओरडते. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओचा शेवट अगदी मजेशीर आहे. (Marathi actor’s umesh kamat and Shruti Marathe’s funny video viral on social media)

त्यांच्या या व्हिडिओवर अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. या व्हिडिओवर तेजस्विनी पंडित, अमृता खानविलकर यांनी हसण्याची ईमोजी पोस्ट केली असून, यासोबत बाकी अनेक चाहते या व्हिडिओवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. त्यांचा हा मजेशीर व्हिडिओ सगळ्यांना खूपच आवडला आहे.

उमेश आणि श्रुती हे दोघेही लोकप्रिय कलाकार आहेत. त्यांनी मालिका आणि चित्रपटात काम करून प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले आहे. उमेशने ‘बाळकडू’, ‘ये रे ये रे पैसा’, ‘लग्न पहावे करून’ अशा अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले आहे. तर श्रुतीने ‘तप्तपदी’, ‘प्रेमसूत्र’, ‘बंध नायलॉनचे’, ‘अरावण’, ‘शुभमंगल सावधान’, ‘इंदिरा विझा’ या चित्रपटात काम केले आहे. तसेच तिने ‘राधा ही बावरी’ या मालिकेत काम केले आहे.

 

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अंमली पदार्थ प्रकरणात आर्यन खानला अटक, किंग खानला भेटण्यासाठी भाईजान पोहोचला ‘मन्नत’ला

-दिशा पटानीने शेअर केला तिचा ‘असा’ दिलकश फोटो, अदा पाहून स्वत:ला रोखू शकला नाही टायगर श्रॉफ

-तेजस्विनी पंडितने सोशल मीडियावर शेअर केले तिचे वेगवेगळे मूड, फोटो पाहून स्वप्नील जोशी म्हणतोय…

हे देखील वाचा