Thursday, December 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

Memories 2021: ‘या’ मराठी कलाकारांनी २०२१ मध्ये बांधली लगीनगाठ, पाहा संपूर्ण यादी

चित्रपटसृष्टीमध्ये नेहमीच काही ना काही चर्चा होत असतात. २०२१ हे वर्ष देखील खूप चर्चेत राहिले. यावर्षी अनेक कलाकारांनी या त्यांच्या चाहत्यांना गोड बातम्या दिल्या आहेत. यावर्षी अनेक कलाकार लग्नबंधनात अडकले आहेत. काहींनी अगदो थाटामाटात लग्न केले, तर काहींनी गुपचूप अगदी सध्या पद्धतीने लग्न केले. लग्न कसेही झाले असो, परंतु या बातमीने त्यांच्या चाहत्यांना मात्र खूप आनंद झाला आहे. (marathi actors who got married in 2021)

सोनाली कुलकर्णी
नेहमीच आपल्या नृत्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांना अडकवून ठेवणारी तसेच मराठी सिनेसृष्टीची अप्सरा म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) होय. सोनालीने बऱ्याच मराठी सिनेमात काम केले आहे . २००६ मध्ये तिने तिच्या करियरची सुरुवात ‘बकुळा नामदेव घोटाळे’ या सिनेमातून केली. हीच सोनाली यावर्षी लग्नबंधनात अडकली. ०७ मे, २०२१ रोजी तिनं कुणाल बेनोडेकरसोबत संसार थाटला. कुणाल हा दुबईमध्ये चार्टर्ड अकाउंटंट म्हणून काम करतो.

अभिज्ञा भावे
आपल्या अभिनय आणि ग्लॅमरस लूकमुळे अभिज्ञा भावे (Abhidnya Bhave) नेहमीच चर्चेत असते. खरंतर सिनेसृष्टीत येण्यापूर्वी अभिज्ञा एयर होस्टेस होती, हे तर सर्वांनाच माहित आहे, पण यापूर्वी तिचं लग्न झाल्याचं खूपच कमी जणांना माहितीये.अभिज्ञाच्या पर्सनल लाईफबद्दल बोलायचं झालं, तर २०१४ साली अभिज्ञा वरुण वैटिकरसोबत विवाहबंधनात अडकली होती. मात्र, काही कारणांमुळं त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अभिज्ञाने मेहूल पैसोबत फोटो शेअर करत प्रेमात असल्याचे सांगितले. अभिज्ञा आणि मेहुल एकाच कॉलेजमध्ये शिकायचे. १५ वर्षांपासून हे दोघे एकमेकांना ओळखायचे. मात्र, कॉलेजनंतर त्यांचा संपर्क तुटला होता. काही दिवसांनी हे दोघे पुन्हा एकमेकांच्या संपर्कात आले. त्यांच्यातली मैत्री पुन्हा फुलत गेली. मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. मेहुलचा देखील घटस्फोट झाला असल्यानं दोघांनीही त्यांच्या नात्याला लग्नात रुपांतर करण्याचा निर्णय घेतला. ६ जानेवारी रोजी मुंबई येथे या दोघांच्या लग्नाची गाठ बांधली गेली.

मानसी नाईक
‘वाट माझी बघतोय रिक्षावाला’ या गाण्यातून फेमस झालेल्या मानसी नाईक (Manasi Naik) हिने लाखो प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले. मानसीची खासियत म्हणजे ती एक उत्तम डान्सर आणि अभिनेत्री सुद्धा आहे. महेश कोठारेंच्या ‘जबरदस्त’ या सिनेमातून अभिनयात पदार्पण केले. ‘बाई वाड्यावर या’ आणि ‘वाट माझी बघतोय रिक्षावाला’ या गाण्यांतून तिने मराठी प्रेक्षकांच्या मनात एक विशेष स्थान निर्माण केले. मानसीसुद्धा लग्नबंधनात अडकली. तिने प्रसिद्ध बॉक्सर प्रदीप खरेरासोबत १९ जानेवारी रोजी संसार थाटला. कोरोनाचे संकट टळलं नसल्याने योग्य ती काळजी घेत काही मोजक्या मित्र-मैत्रिणी आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत मानसीचा विवाहसोहळा पार पडला. अभिनत्री दिपाली सय्यद, रेशम टिपणीस यांच्यासह काही कलाकारांनीही मानसीच्या लग्नसोहळ्याला हजेरी लावली.

मिताली मयेकर
‘बिल्लू बार्बर’ या हिंदी सिनेमात इरफान खान आणि लारा दत्ता यांच्या मुलीची भूमिका साकारलेली अभिनेत्री म्हणजे मिताली मयेकर (Mitali Mayekar) होय. मितालीने मराठी सिनेसृष्टीतील चॉकलेट बाॅय म्हणून ओळखला जाणारा अभिनेता सिद्धार्थ चांदेकरसोबत २४ जानेवारी रोजी पुण्यातील ढेपेवाड्यात लग्न केले. ते दोघेही २ वर्ष रिलेशनशीपमध्ये होते.

रसिका सुनील
‘शनाया’ या चंचल, नटखट आणि बिनधास्त पात्राने आख्ख्या महाराष्ट्राला वेड लावणारी अभिनेत्री म्हणजे रसिका सुनील (Rasika Sunil) होय. सर्वांची लाडकी अभिनेत्री रसिका सुनील १८ ऑक्टोबर रोजी बॉयफ्रेंड आदित्य बिलागीसोबत लग्नबंधनात अडकली. अनेक महिन्यांपासून त्यांच्या रिलेशनबाबत चर्चा चालू होत्या. तसेच त्यांनी सोशल मीडियावर देखील त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर केले होते. त्यातून त्यांच्या अफेअरची सर्वांना चाहूल लागली होती. त्यांच्यातील बॉंडिंग पाहून चाहत्यांना देखील त्यांची जोडी खूप आवडायला लागली होती. परंतु त्यांनी कोणालाही कल्पना न देता लग्न केले आणि १५ दिवसांनी अधिकृतरीत्या ही माहिती सर्वांना दिली.

सुयश टिळक
मराठी सिनेमा खासकरून मालिकांमधील सर्वांचा लाडका आणि प्रसिद्ध अभिनेता अशी ओळख असणाऱ्या सुयश टिळकने (Suyash Tilak) खूपच कमी काळात स्वतःचं मोठं प्रस्थ निर्माण केलं. विशेषतः मुलींच्या गळ्यातील ताईत झालेल्या सुयशनं डान्सर आणि अभिनेत्री असलेल्या आयुषी भावेसोबत २१ ऑक्टोबर रोजी लग्न केले आहे.

हे कलाकार आहेत ज्यांनी २०२१ मध्ये लग्न केले आहे. त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत होते. मनोरंजन क्षेत्रात या कलाकारांनी त्यांच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा