Friday, December 13, 2024
[aioseo_breadcrumbs]

अभिज्ञा भावेने केली मंगळागौर साजरी, ‘या’ अभिनेत्रींनी देखील लावली हजेरी

श्रावण महिना सुरू झाला की, महाराष्ट्रातील घराघरात सण साजरे होतात. आपल्या भारतीय संस्कृतीनुसार श्रावण महिन्याला खूप महत्व आहे. या महिन्यात अनेक सण येतात. बायकांसाठी खास करून या महिन्यात अनेक सण असतात. या महिन्यात बायका अनेक खेळ खेळतात. यातील एक सण आणि महिलांचा आवडता खेळ म्हणजे मंगळागौर. नवीन लग्न झालेल्या अनेक महिलांची श्रावण महिन्यात मंगळागौर साजरी केली जाते. अशातच यावर्षी नुकतेच नवीन लग्न झालेली अभिनेत्री अभिज्ञा भावे हिची देखील मंगळागौर झाली आहे. तिच्या मंगळागौरचे फोटो आणि व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

अभिज्ञाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिच्या मंगळागौरचे काही व्हिडिओ शेअर केले आहेत. या व्हिडिओमध्ये पारंपारिक पद्धतीने सगळ्या गोष्टी पाहायला मिळत आहेत. बायकांना केळीच्या पानावर जेवायला दिले आहे. तसेच सगळ्याजणी श्लोक म्हणताना दिसत आहेत. तसेच सगळ्या बायका मंगळागौरीचे खेळ खेळताना दिसत आहेत. अभिज्ञादेखील खेळ खेळत आहे. यामध्ये तिने हिरव्या रंगाची साडी नेसली आहे. तसेच केसात गजरा घातला आहे. ती या सगळ्या गोष्टी एन्जॉय करताना दिसत आहे. तिच्या या मंगळागौरीमध्ये तिच्या मैत्रिणी आणि अभिनेत्री अनुजा साठे आणि रेश्मा शिंदे यांनी हजेरी लावलेली आहे. त्या देखील त्यांच्या मैत्रिणीची मंगळागौर एन्जॉय करताना दिसत आहेत. (marathi actress abhidnya bhave enjoing her manglagaur, video viral on social media)

अभिज्ञाने शेअर केलेला हा व्हिडिओ तिच्या चाहत्यांना खूप आवडत आहे. अनेकजण यावर कमेंट करत आहेत. यावर रेश्मा शिंदे हिने “माऊ,” अशी कमेंट केली आहे, तर मयुरी देशमुखने “आई गं किती गोड,” अशी कमेंट केली आहे. अनुजा साठे हिने “मॅडनेस,” अशी कमेंट केली आहे. तसेच अनेक चाहते कमेंट करून आपली भारतीय संस्कृती जपली जातीये म्हणून तिचे भरभरून कौतुक करत आहेत.

अभिज्ञाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. तिने ‘खुलता कळी खुलेना’, ‘तुला पाहते रे’, ‘रंग माझा वेगळा’, लगोरी’, ‘देवयानी एक्का राजा राणी’, ‘लव्ह यू जिंदगी’, ‘प्यार की ये कहाणी’ या मालिकेमध्ये काम केले आहे. तसेच ती सध्या ‘पवित्र रिश्ता २.०’ या मालिकेत अंकिता लोखंडेसोबत काम करत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘…खोटं वाटतं, बरं तुझी शप्पथ’, प्राजक्ता माळीच्या सुंदर फोटोवरील चाहत्याची कमेंट चर्चेत

-‘या’ क्लोथिंग ब्रँडचा मालक आहे करणवीर बोहरा; वडील अन् आजोबांचेही होते चित्रपटांशी नाते

-‘इथे सूर्यप्रकाश येतोय…’, म्हणत अनन्या पांडेने शेअर केले घायाळ करणारे ‘ब्लॅक ऍंड व्हाईट’ फोटोशूट

हे देखील वाचा