Sunday, January 18, 2026
Home मराठी ‘अशी मुलगी जी कधीही घाबरत नाही’, म्हणत अभिज्ञा भावेने शेअर केले तिचे ग्लॅमरस फोटो

‘अशी मुलगी जी कधीही घाबरत नाही’, म्हणत अभिज्ञा भावेने शेअर केले तिचे ग्लॅमरस फोटो

अभिनेत्री अभिज्ञा भावे हिचा समावेश सोशल मीडियावर सर्वात जास्त सक्रिय असणाऱ्या अभिनेत्रींमध्ये होतो. अनेकवेळा तिचे फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचे चाहते देखील तिच्या प्रत्येक फोटोला जोरदार प्रतिसाद देत असतात. अशातच तिने तिचे काही ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

अभिज्ञाने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने तपकिरी रंगाचा टी-शर्ट आणि लाल रंगाचा लेदर स्कर्ट घातला आहे. तसेच पायात पांढऱ्या रंगाचे शूज घातले आहेत. तसेच निम्मे केस मागे बांधले आहेत. या फोटोमध्ये तिने न्यूड मेकअप केला आहे आणि गडद लाल रंगाची लिपस्टिक लावली आहे. फोटोमध्ये ती खूपच आकर्षक दिसत आहे. (Marathi actress abhidnya bhave share her glamorous photos on social media)

हे फोटो शेअर करून तिने कॅप्शन दिले आहे की, “अशी मुलगी जी कधीच घाबरत नाही.” तिने शेअर केलेल्या या फोटोवर तिच्या चाहत्यांच्या सातत्याने प्रतिक्रिया येत आहेत. तिच्या एका चाहत्याने या फोटोवर “मेरी जान” अशी कमेंट केली आहे, तर बाकी अनेकजण या फोटोवर त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.

अभिज्ञाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. तिने ‘खुलता कळी खुलेना’, ‘तुला पाहते रे’, ‘रंग माझा वेगळा’, लगोरी’, ‘देवयानी’, ‘लव्ह यू जिंदगी’, ‘प्यार की ये कहाणी’ या मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच ती सध्या ‘पवित्र रिश्ता २.०’ या मालिकेत अंकिता लोखंडेसोबत काम करत आहे. या मालिकेत ती अर्चनाच्या वहिनीचे म्हणजे मंजुषाचे पात्र साकारत आहे. या मालिकेत ती नकारात्मक भूमिकेत आहे. याआधी देखील तिने अनेक मालिकांमध्ये नकारात्मक भूमिका साकारल्या आहेत. पण तरीही तिने प्रेक्षकांच्या मनात तिचे अढळ स्थान निर्माण केले आहे. तसेच तिने काही दिवसांपूर्वी ‘चला हवा येऊ द्या’ या शोमध्ये देखील काम केले आहे. या शोमध्ये तिच्या विनोदी अंदाजाने तिने आख्खा महाराष्ट्राला हसवले आहे.

 

 

हे देखील वाचा