मराठी टेलिव्हिजनवर काम करून रसिकांच्या मनात अभिनेत्री अभिज्ञा भावे हिने तिची खास जागा निर्माण केली आहे. तिची पात्र प्रेक्षकांना खूप आवडतात. सोशल मीडियावर देखील ती बऱ्यापैकी सक्रिय असते. तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत असतात. तिचे चाहते देखील तिच्या पोस्टला भरभरून प्रतिसाद देत असतात.
अभिज्ञाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने काळ्या रंगाचा ट्रान्स्फरंट टॉप आणि निळ्या रंगाची जिन्स घातली आहे. केसांची पोनीटेल त्यावर तिचा न्यूड मेकअप तिच्या या लूकला चार चाँद लावत आहे. एकूणच काय तर या संपूर्ण क्लासी लूकमध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे.(Marathi actress abhidnya bhave share her glamorous photos on social media)
तिच्या चाहत्यांना देखील तिचा हा लूक खूप आवडला असून, हा लूक चांगलाच व्हायरल होत आहे. अनेकजण तिच्या या फोटोवर प्रतिक्रिया देत आहेत. याआधी तिने शेअर केलेल्या फोटोंना देखील तिच्या चाहत्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला होता.
अभिज्ञाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. तिने ‘खुलता कळी खुलेना’, ‘तुला पाहते रे’, ‘रंग माझा वेगळा’, लगोरी’, ‘देवयानी एक्का राजा राणी’, ‘लव्ह यू जिंदगी’, ‘प्यार की ये कहाणी’ या मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच ती सध्या ‘पवित्र रिश्ता २.०’ या मालिकेत अंकिता लोखंडेसोबत काम करत असून, या मालिकेत ती अर्चनाच्या वहिनीचे म्हणजे मंजुषाचे पात्र साकारताना दिसणार आहे. मुख्य म्हणजे या मालिकेत ती एका नकारात्मक भूमिकेतून सर्वांनसमोर येणार असून, यासाठी ती खूप उत्सुक दिसत आहे. याआधी देखील तिने अनेक मालिकांमध्ये नकारात्मक भूमिका साकारल्या आहेत. पण तरीही तिने प्रेक्षकांच्या मनात तिचे अढळ स्थान निर्माण केले आहे. तसेच तिने काही दिवसांपूर्वी ‘चला हवा येऊ द्या’ या शोमध्ये देखील काम केले. या शोमध्ये तिच्या विनोदी अंदाजाने तिने संपूर्ण महाराष्ट्राला हसवले आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-साधना शिवदासानी जगल्या ‘अशा’ प्रकारचे जीवन, ‘या’ कारणास्तव ठोकला होता अभिनयक्षेत्राला राम राम!