मराठी टेलिव्हिजनवर काम करून रसिकांच्या मनात अभिनेत्री अभिज्ञा भावे हिने तिची खास जागा निर्माण केली आहे. तिचे पात्र प्रेक्षकांना खूप आवडतात. सोशल मीडियावर देखील ती बऱ्यापैकी सक्रिय असते. तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. तिचे चाहते देखील तिच्या पोस्टला भरभरून प्रतिसाद देत असतात. अशातच तिचे साडीमधील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
अभिज्ञाने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचे साडीमधील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने सोनेरी रंगाची साडी नेसली आहे. तसेच यावर तिने हिरव्या रंगाचा ब्लाऊज घातला आहे. गळ्यात हिरव्या रंगाचा नेकलेस आणि कानात सोनेरी रंगाचे ईअरिंग घातले आहेत. तिने कपाळावर हिरव्या रंगाची टिकली लावली आहे. तसेच मिडल पार्टेशन करून केस मागे बांधले आहेत. या फोटोमध्ये ती साडीसोबत वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे. (Marathi actress abhidnya bhave share her saree look photos on social media)
हा फोटो शेअर करून तिने कॅप्शन दिले आहे की, “तरीही मी उठते.” तिचा साडीमधील हा मनमोहक अंदाज तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. अनेक चाहते या फोटोवर कमेंट करून तिचे कौतुक करत आहेत. तसेच काही दिवसांपूर्वी सई ताम्हणकरने देखील असाच लूक केला होता. त्यामुळे आता नेटकरी सई ताम्हणकर आणि अभिज्ञा भावे यांची तुलना करत आहेत.
अभिज्ञाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. तिने ‘खुलता कळी खुलेना’, ‘तुला पाहते रे’, ‘रंग माझा वेगळा’, लगोरी’, ‘देवयानी एक्का राजा राणी’, ‘लव्ह यू जिंदगी’, ‘प्यार की ये कहाणी’ या मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच ती सध्या ‘पवित्र रिश्ता २.०’ या मालिकेत अंकिता लोखंडेसोबत काम करत आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-तेजश्री प्रधान म्हणाली, ‘कॅप्शन सुचवा’; चाहत्यांनी दिलखेचक फोटोवर पाडला कौतुकांचा पाऊस
-‘दिसला गं बाई दिसला’, म्हणणाऱ्या ‘राजा राणीची गं जोडी’ फेम संजूचा गावरान अवतार भावला नेटकऱ्यांना