छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री म्हणून अभिज्ञा भावे ओळखली जाते. अभिज्ञाने तिच्या अभिनयाने आणि तिच्या लुक्सने नेहमीच प्रेक्षकांची वाहवा मिळवत असते. विविध मालिकांमधून अभिज्ञाने तिच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे असे वेगळे स्थान निर्माण केले आहे. अभिज्ञा नेहमीच तिच्या उपस्थितीने सर्वांचे लक्ष वेधून घेते. अभिज्ञा तिच्या अभिनयात जितकी प्रभावी आहे, तितकीच ती तिच्या फॅशन सेन्सने सर्वांवर भुरळ घालत असते. अभिज्ञाचा फॅशन सेन्स आणि तिचे फॅशनवरील प्रेम हे वेळोवेळी आपल्याला दिसतच असते.
अभिज्ञा नेहमीच त्याचे वेगवेगळे फोटोशूट करत असते आणि त्यातले मोजके फोटो ती तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर देखील करत असते. अभिज्ञाने नुकताच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एका सुंदर फोटो शेअर केला आहे. हा फोटो पाहून पाहणाऱ्यांच्या नजरा तिच्या या फोटोवर खिळून राहत आहे. या फोटोमध्ये तिने पांढऱ्या रंगाच्या स्ट्रीपचा स्लिव्हलेस टि-शर्ट घातला असून, त्यावर गुलाबी रंगाचा नेटचा प्रदर्शित टॉप घातला आहे. यावर तिने ऍक्सेसरीजमध्ये फक्त मोठ्या रिंग्स आणि हातात एक बांगडी घातली आहे. तिच्या या फोटोचे आकर्षण म्हणजे तिचे कुरळे केस. हा फोटो शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले, “घुंघराले बाल…नशिली आंखे…”
अभिज्ञा तिच्या प्रत्येक लूकमध्ये सुंदर आणि आकर्षक दिसते. पारंपरिक पोशाखांपासून ते अगदी वेस्टर्न ड्रेसपर्यंत ती सर्वच कपडे खूपच उत्तम पद्धतीने कॅरी करते. तिच्या या फोटोची आणि सौंदर्याची स्तुती करणा-या असंख्य कमेंट्स या फोटोवर आल्या आहेत. अभिज्ञाच्या चाहत्यांसोबतच अनेक सेलिब्रिटींनी देखील तिच्या या फोटोंवर कमेंट्स केल्या आहेत.
अभिज्ञा भावे ही ‘खुलता कळी खुलेना’, ‘तुला पाहते रे’ आणि ‘रंग माझा वेगळा’ यांसारख्या मालिकांमधून घराघरांत पोहोचली आहे. लवकरच ती अभिज्ञाच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर ती सध्या ‘पवित्र रिश्ता 2’ या हिंदी मालिकेतून झळकणार आहे. आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन अभिज्ञा ‘पवित्र रिश्ता 2’ मालिकेच्या सेटवरील आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. उत्तम अभिनयासोबतच अभिज्ञा तिच्या ‘तेजाज्ञा’ या कपड्यांच्या ब्रँण्डसाठीही प्रसिद्ध आहे. ‘तेजाज्ञा’ हा कपड्यांचा ब्रँड अभिज्ञा भावे आणि तेजस्विनी पंडितने मिळून लाँच केला आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-किर्तनकार शिवलीला पाटील बिग बाॅस मराठीच्या घराबाहेर? पाहा काय आहे नक्की प्रकरण
-पर्सच्या निमित्ताने पुन्हा रंगला अनुपम खेर आणि त्यांच्या आईमध्ये मजेशीर संवाद
-‘या’ कलाकारांनी बिग बॉसमध्ये सहभागी होण्यासाठी निर्मात्यांकडून घेतले होते बक्कळ पैसे