Monday, July 1, 2024

बिच्चारा मेहुल! अभिज्ञा भावेची नवऱ्यावर दादागिरी, व्हिडिओ होतोय सोशल मीडियावर व्हायरल

राग हा गोड प्रेमाचा भाग असतो असे अनेकदा म्हणले जाते. त्यामुळेच पती पत्नीमध्ये होणारी भांडणे अगदीच सामान्य मानली जातात. कारण ही भांडणे का होतील, कोणत्या कारणावरुन होतील हे काही सांगता येत नाही. सध्या मराठी अभिनेत्री अभिज्ञा भावेचाही (Abhidnya Bhave) असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती पतीसोबत जोरजोराने भांडताना दिसत आहे. काय आहे हा व्हिडिओ आणि काय होते त्यांच्या भांडणाचे कारण चला जाणून घेऊ. 

अभिज्ञा भावे ही मराठी सिने जगतातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या दमदार अभिनयाने आणि सोज्वळ सौंदर्याने तिने सिने जगतात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आपल्या अभिनयाइतकीच अभिज्ञा सोशल मीडियावरही नेहमीच सक्रिय असते. ज्यावरुन ती आपल्या चाहत्यांशी वेगवेगळे व्हिडिओ तसेच फोटो शेअर करताना दिसत असते. सध्या अभिनेत्रीचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे , ज्यामध्ये ती पतीशी भांडताना दिसत आहे.

अभिनेत्रीने हा व्हिडिओ आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अभिज्ञा आपल्या पतीसोबत बसलेली दिसत आहे. यावेळी ती व्हिडिओमध्ये आनंदी वैवाहिक आयुष्याचे हे काही मार्ग आहेत ज्यामध्ये तुमच्या नवऱ्याचे म्हणणे ऐका आणि त्याला आदराने वागवा असे सांगताना दिसत आहे. परंतु तिचे हे वाक्य पुर्ण होताच पती मेहुल काहीतरी बोलायला जातो. पण त्याला लगेच मोठ्या आवाजात ओरडून त्याला एकही वाक्य बोलू न देता गप्प करते. त्यानंतर ती पुढे सांगताना आणि त्यालाही बोलण्याची संधी द्या असे सांगताना दिसत आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Abhidnya bhave (@abhidnya.u.b)

 

अभिज्ञा भावेचा हा विरोधाभास दाखवणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे ज्यावर नेटकऱ्यांच्या मजेशीर प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. अभिनेत्रीच्या या व्हिडिओवर फक्त चाहतेच नव्हेतर अनेक कलाकारही प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. दरम्यान असे असले तरी अभिज्ञा आणि तिच्या पतीचे नाते खूपच खास आहे. अभिज्ञाच्या पतीने नुकतीच कॅन्सरवर मात केली. या काळात तिने पतीला खंबीर साथ दिली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा –अबब! अवघ्या काही सेकंदाच्या जाहिरातीसाठी कलाकार घेतात ‘इतके’ मानधन, आकडा पाहून होतील डोळे पांढरे

सहा वर्षांपूर्वी जिथं स्पर्धक म्हणून झिजवले पाय, तिथं स्पर्धकांना आपल्याच तालावर नाचवणार नोरा

भावा जरा दमानं! जास्तच रिव्हिलिंग ड्रेस घालून आलेली दिशा पटानी, मग शेजारी बसलेल्या व्यक्तीचेही सुटले नियंत्रण

हे देखील वाचा