झी मराठी या वाहिनीवरील एक मालिका चांगलीच गाजली होती. अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात हक्काचे स्थान निर्माण केले होते. ती मालिका म्हणजे ‘तुझ्यात जीव रंगला’. या मालिकेने प्रेक्षकांचे जबरदस्त मनोरंजन केले. यासोबत मालिकेत मुख्य भूमिकेत असणाऱ्या पात्रांना देखील खूप चांगली ओळख मिळाली. राणाचा कोल्हापूरी रांगडा बाज आणि पाठकबाईंचा शिस्तप्रिय अंदाज प्रेक्षकांना भावला होता. या मालिकेत ही पात्र हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांनी निभावली होती. दोघांच्या अभिनयाला देखील खूप चांगली दाद मिळाली होती. या मालिकेने बऱ्याच दिवसांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला. परंतु त्यांची लोकप्रियता अजूनही तशीच आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून दोन्हीही कलाकार आजही प्रेक्षकांशी जोडून आहेत. अशातच अक्षयाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधत आहे.
अक्षयाने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने करड्या रंगाची नऊवारी साडी नेसली असून, त्यावर तिने लाल रंगाचा ब्लाऊज घातला आहे. गळ्यात ऑक्साइड ज्वेलरी, पायात पैंजण, केसात गुलाबाची फुले माळली आहेत. अक्षयाचा हा ठसकेबाज मराठमोळा लूक सध्या सर्वत्र चर्चेत आहे. या व्हिडिओमध्ये ती झोपाळ्यावर बसून झोका घेतात दिसत असून, व्हिडिओच्या बॅकग्राउंडला ‘सैराट’ चित्रपटातील ‘याड लागलं’ या गाण्याचे म्युझिक चालू आहे. (Marathi actress akshaya deodhar share her video on social media)
तिचे चाहते या व्हिडिओवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. तिच्या एका चाहत्याने या व्हिडिओवर कमेंट केली आहे की, “आणि आम्हाला तुझं याड लागलं.” तर आणखी एकाने कमेंट केली आहे की, “असे रूप आणि शृंगार असल्यास कोणासही येड लागेल.”
अक्षयाच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, तिने अमेय वाघ नाटक कंपनीद्वारे तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. पुढे तिला ‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका मिळाली आणि याच मालिकेने अभिनेत्रीला घराघरात पोहचवले. या मालिकेतील मुख्य भूमिकेत असणारा हार्दिक जोशी सध्या झी मराठीवरील ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ या मालिकेत काम करत आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
–बॉलिवूडचे ‘हे’ मोठे सिनेमे ठरले नुसताच फुसका बार, कमाईतून बजेट वसूल करणे देखील झाले मुश्किल
–बॉलिवूडच्या ‘या’ दिग्गज अभिनेत्रींनी लग्नानंतर त्यांच्या यशस्वी चित्रपटांच्या करिअरला ठोकला रामराम