झी मराठी या वाहिनीवरील एक मालिका चांगलीच गाजली होती. अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात हक्काचे स्थान निर्माण केले होते. ती मालिका म्हणजे ‘तुझ्यात जीव रंगला’ होय. या मालिकेने प्रेक्षकांचे जबरदस्त मनोरंजन केले. यासोबत मालिकेत मुख्य भूमिकेत असणाऱ्या पात्रांना देखील खूप चांगली ओळख मिळाली. राणाचा कोल्हापूरचा रांगडा बाज आणि पाठकबाईंचा शिस्तप्रिय अंदाज प्रेक्षकांना भावाला होता. या मालिकेत ही पात्रं हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांनी निभावली होती. दोघांच्या अभिनयाला देखील खूप चांगली दाद मिळाली होती. या मालिकेने बऱ्याच दिवसांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. परंतु त्यांची लोकप्रियता अजूनही तशीच आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून दोन्हीही कलाकार आजही प्रेक्षकांशी जोडून आहेत. अशातच अक्षया देवधरचा एक फोटो सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधत आहे.
अक्षयाच्या इंस्टाग्राम फॅन पेज अकाउंटवरून तिचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती प्रचंड सुंदर दिसत आहे. तिने साऊथ इंडियन मेकओव्हर केला आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने निळ्या रंगाची सोनेरी काठ असलेली साडी नेसलेली आहे. यावर तिने गुलाबी रंगाचा ब्लाऊज घातला आहे. तसेच सगळी ज्वेलरी घातली आहे. तसेच हातात बांगड्या आणि बिंदी लावलेली दिसत आहे. या गेटअपमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. (marathi actress Akshaya Deodhar photos viral on social media)
हा फोटो शेअर करून लिहिले आहे की, “जीवनातील सर्वात महान गुरु म्हणजे वेळ. कारण वेळ जे शिकवते, ते इतर कोणीही शिकवू शकत नाही.” तिच्या अनेक चाहत्यांना तिचा हा लूक खूप आवडला आहे. अनेकजण या फोटोवर सातत्याने कमेंट करत आहे. अनेकजण तिच्या या लूकचे कौतुक करत आहेत, तर काहींना तिने दिलेले कॅप्शन खूप आवडत आहे. अशाप्रकारे तिचा हा फोटो सोशल मीडियावर सध्या जोरदार व्हायरल होत आहे.
अक्षया आणि हार्दिक यांनी नुकतेच एक फोटोशूट केले. त्यामुळे ते दोघे खूप चर्चेत आले होते. ते पुन्हा एकत्र काम करणार आहेत, अशा सर्वत्र चर्चा रंगू लागल्या होत्या. हार्दिक आता पुन्हा एकदा झी मराठीवरील ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ या मालिकेत मुख्य भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘…खोटं वाटतं, बरं तुझी शप्पथ’, प्राजक्ता माळीच्या सुंदर फोटोवरील चाहत्याची कमेंट चर्चेत
-‘या’ क्लोथिंग ब्रँडचा मालक आहे करणवीर बोहरा; वडील अन् आजोबांचेही होते चित्रपटांशी नाते
-‘इथे सूर्यप्रकाश येतोय…’, म्हणत अनन्या पांडेने शेअर केले घायाळ करणारे ‘ब्लॅक ऍंड व्हाईट’ फोटोशूट