Saturday, September 21, 2024
Home मराठी ‘काय अवतार केलाय बया हिने’, अमृता खानविलकरच्या इंग्लिश गाण्यावर आणि तिच्या अवतारावर चाहत्यांची नाराजी

‘काय अवतार केलाय बया हिने’, अमृता खानविलकरच्या इंग्लिश गाण्यावर आणि तिच्या अवतारावर चाहत्यांची नाराजी

‘नटरंग’ चित्रपटातील ‘वाजले की बारा’ या गाण्यावर थिरकत, अभिनेत्री अमृता खानविलकरने प्रेक्षकांची मने चोरली. आपल्या अप्रतिम नृत्य कौशल्याने तिने इंडस्ट्रीमध्ये आपली जबरदस्त ओळख निर्माण केली आहे. याशिवाय अमृता आपल्या फिटनेसबाबत मोठ्या प्रमाणात चर्चेत असते. दरदिवशी वेगवेगळ्या योगा पोझेसचे वेगवेगळे पोस्ट्स शेअर करत, अभिनेत्री अवघ्या सोशल मीडियाचे लक्ष वेधते. नुकताच सोशल मीडियावर तिचा एक डान्स व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

अमृताने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ती ‘वूमन’ या इंग्रजी गाण्यावर जोरदार ठुमके मारताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तिने निळ्या रंगाची रिप्ड जीन्स घातली असून, तसेच ब्रा वर एक पांढऱ्या रंगाचा पारदर्शक शर्ट घातला आहे. तसेच या शर्टचे देखील तिने एकच बटन लावलेले दिसत आहे. यावर तिने कुरळे केस ठेवले आहेत. या व्हिडिओमध्ये ती खूप सुंदर डान्स करताना दिसत आहे. (marathi actress amruta khanvilkar share her dance video on social media)

अमृताचा हा इंग्लिश अवतार काहींना खूप आवडला आहे तर काहीजण तिला जोरदार ट्रोल करत आहेत. तिच्या या व्हिडिओवर प्रसाद ओक, वैदेही परशुरामी, आदिनाथ कोठारे, ऋतुजा बागवे, सोनाली खरे आणि आदित्य सरपोतदार यांनी हार्ट तसेच फायर इमोजी पोस्ट केले आहेत. परंतु तिच्या चाहत्यांना तिचा हा अंदाज अजिबात आवडलेला दिसत नाही. तिच्या एका चाहत्याने या फोटोवर कमेंट केली आहे की, “या दिवाळीला नवीन जीन्स घेऊन टाक.” तर आणखी एका चाहत्याने कमेंट केली आहे की, “जर कपडे फाटले असतील माझ्याशी संपर्क साधा.” तर आणखी एक जण म्हणतोय की, “असल्या फाटक्या जीन्स कुठे मिळतात. ” तर आणखी एकाने लिहिले आहे “काय अवतार केलाय बया हिने.”

अमृता खानविलकरने ‘गोलमाल’ या मराठी चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. यानंतर ती बऱ्याच चित्रपटात पाहायला मिळाली. इतकेच नव्हे, तर तिने हिंदी चित्रपटातही बऱ्याच महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. तिच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर काही दिवसांपूर्वीच अभिनेत्रीचा ‘वेल डन बेबी’ हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. यात तिच्यासोबत पुष्कर जोग आणि वंदना गुप्ते हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. याशिवाय लवकरच ती ‘पॉंडीचेरी’ या मराठी चित्रपटातही दिसणार आहे.

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-उफ्फ ब्यूटी! तेजस्विनीच्या स्टायलिश लूकने इंटरनेटवर लावली आग, बेडवर बसून देतेय फोटोसाठी पोझ

-शाहरुख खान पुन्हा एकदा दिसणार ‘डबल रोल’मध्ये? जाणून घ्या काय आहे आगामी चित्रपटाची कथा

-उर्वशी रौतेलालाही मिळाला दुबईचा गोल्डन व्हिसा, फोटो शेअर करत व्यक्त केला आनंद

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा