Friday, July 5, 2024

‘अशक्य सुंदर’, अमृता खानविलकरचा फोटो पाहून चाहते तर सोडाच, कलाकारांनीही पाडला कमेंट्सचा पाऊस

मराठी चित्रपटसृष्टीत अत्यंत बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्रींचा जेव्हा उल्लेख होतो, तेव्हा अभिनेत्री अमृता खानविलकर हिच्या नावाचा समावेश होतोच. अमृता ही विविध गुणसंपन्न अभिनेत्री आहे. तिने चित्रपटात वेगवेगळ्या भूमिका निभावून तिची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सोशल मीडियावर देखील अमृता बऱ्यापैकी सक्रिय असते. तिचे अनेक फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. अशातच तिचे बोल्ड फोटो व्हायरल होत आहेत.

अमृताने सोशल मीडियावर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे. तिने काळ्या रंगाची साडी नेसली आहे. यावर तिने स्लीव्हलेस ब्लाऊज घातला आहे. तसेच कानात काळ्या रंगाचे ईअरिंग घातले आहेत. या फोटोमध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे. या साडीमध्ये ती वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे. (Marathi actress amruta Khanvilkar share her glamorous photo on social media)

अनेकजण तिच्या या फोटोवर कमेंट करत आहेत. तिच्या चाहत्यांना तिचा हा लूक खूप आवडला आहे. तिच्या एका चाहत्याने या फोटोवर कमेंट केली आहे की, “तू काय आहेस गं परी का अप्सरा.” तसेच मंजिरी ओक हिने ‘”खल्लास,” अशी कमेंट केली आहे, तर श्रेया बुगडे हिने “स्टनर,” तसेच सायली संजीव हिने “अशक्य सुंदर,” अशी कमेंट केली आहे. तसेच धनश्री काडगावकर हिने “ब्युटीफुल,” अशी कमेंट केली आहे.

अमृताच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने अनेक मराठी चित्रपटात काम केले आहे. तिने ‘नटरंग’, ‘चोरीचा मामला’, ‘वेलकम जिंदगी’, ‘बाजी’, ‘वेल डन बेबी’ या चित्रपटात काम केले आहे. तसेच तिने ‘जीवलगा’ या लोकप्रिय मालिकेत देखील काम केले आहे. या मालिकेत तिचासोबत स्वप्नील जोशी, सिद्धार्थ चांदेकर आणि मधुरा देशपांडे हे कलाकार होते.

तिने ‘गोलमाल’ या मराठी चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. यानंतर ती बऱ्याच चित्रपटात पाहायला मिळाली. इतकेच नव्हे, तर तिने हिंदी चित्रपटातही बऱ्याच महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्रीचा ‘वेल डन बेबी’ हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. यात तिच्यासोबत पुष्कर जोग आणि वंदना गुप्ते हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. याशिवाय लवकरच ती ‘पॉंडीचेरी’ या मराठी चित्रपटातही दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘कुछ कुछ होता है अभ्या…’, म्हणत ‘सुंदरा मनामध्ये भरली’ फेम अक्षयाने मजेशीर फोटो केले शेअर

-‘तू तुझा प्रोग्राम सुरू कर, मीच बॉस म्हणून’, वीकेंडला मांजरेकरांकडून मीरा अन् गायत्रीची खरडपट्टी

-‘तू चाल पुढं तुला रं गड्या भीती कशाची’, कुशल बद्रिकेच्या फोटोवर चाहत्यांची भन्नाट कमेंट ठरतेय लक्षवेधी

हे देखील वाचा