Saturday, September 21, 2024
Home मराठी ‘ऍडमिट आहे डॉक्टरांना सांगा लवकर डिस्चार्ज द्यायला’, अमृताच्या ग्लॅमरस फोटोंवर नेटकऱ्याची लक्षवेधी कमेंट

‘ऍडमिट आहे डॉक्टरांना सांगा लवकर डिस्चार्ज द्यायला’, अमृताच्या ग्लॅमरस फोटोंवर नेटकऱ्याची लक्षवेधी कमेंट

मराठी चित्रपटसृष्टीतील अत्यंत बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्रींचा जेव्हा उल्लेख होतो, तेव्हा अभिनेत्री अमृता खानविलकर हिच्या नावाचा समावेश असतोच. अमृता ही विविध गुणसंपन्न अभिनेत्री आहे. तिने चित्रपटात वेगवेगळ्या भूमिका निभावून तिची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सोशल मीडियावर देखील अमृता बऱ्यापैकी सक्रिय असते. तिचे अनेक फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. अशातच तिचे हॉट फोटो व्हायरल होत आहेत.

अमृताने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिने आकाशी रंगाचा बॉडी फिटेड ड्रेस घातला आहे. तसेच कानात रिंगा घातलेल्या आहेत, सगळे केस कर्ली करून मोकळे सोडले आहेत. तसेच तिने नोजपीन घातलेली दिसत आहे. (Marathi actress amruta Khanvilkar share her hot look on social media)

अमृताने शेअर केलेल्या या फोटोवर नेहमीप्रमाणेच कौतुकाचा वर्षाव होत आहे. तिचा मॉर्डन लूक असो किंवा पारंपारिक लूक असो तिचे चाहते नेहमीच तिचे तोंडभरून कौतुक करत असतात. अमृताने शेअर केलेल्या या फोटोवर मंजिरी ओक, आदिनाथ कोठारे, प्रसाद ओक या कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच तिच्या एका चाहत्याने कमेंट केली आहे की, “ऍडमिट आहे डॉक्टरांना सांगा डिस्चार्ज द्यायला लवकर?” तसेच इतर चाहते देखील या फोटोवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत.

अमृता खानविलकरने ‘गोलमाल’ या मराठी चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. यानंतर ती बऱ्याच चित्रपटात दिसली. इतकेच नव्हे, तर तिने हिंदी चित्रपटातही बऱ्याच महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. तिच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर काही दिवसांपूर्वीच अभिनेत्रीचा ‘वेल डन बेबी’ हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. यात तिच्यासोबत पुष्कर जोग आणि वंदना गुप्ते हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. याशिवाय लवकरच ती ‘पॉंडीचेरी’ या मराठी चित्रपटातही दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-स्टायलिश अन् रंगीबेरंगी ड्रेसमध्ये मृण्मयी दिसतेय एकदम झक्कास; पाहून तुम्हीही पडाल प्रेमात

-तेजश्री प्रधान म्हणाली, ‘कॅप्शन सुचवा’; चाहत्यांनी दिलखेचक फोटोवर पाडला कौतुकांचा पाऊस

-‘लय भारी’ तेजस्विनीच्या मराठमोळ्या सौंदर्याची सर्वांनाच भुरळ, पदरावरील ‘त्या’ श्लोकाने वेधले खास लक्ष

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा