Monday, July 1, 2024

एक लाजरान साजरा मुखडा…! वेस्टर्न लूकनंतर आता सर्वत्र रंगलीय अमृता खानविलकरच्या देसी लूकची चर्चा

मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात सुंदर आणि बोल्ड अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर. अमृता मागील अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. तिचे वेस्टर्न, पारंपारिक, बोल्ड फोटो ती सातत्याने सोशल मीडियावर शेअर करत आहे. नुकतेच काही दिवसांपूर्वी तिने तिचा ग्लॅमरस लूक सोशल मीडियावर चाहत्यांना दाखवला होता. तिच्या या फोटोला चांगलीच पसंती मिळाली होती. तिच्या या लूकची सर्वत्र चर्चा रंगलीय. तिचे देसी लूकमधील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

अमृताने तिच्या सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहे. ज्यामध्ये ती अत्यंत सुंदर आणि बोल्ड दिसत आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने काळ्या आणि चंदेरी रंगाची साडी नेसली आहे. तसेच तिने यावर काळ्या रंगाचा स्लीव्हलेस ब्लाऊज परिधान केला आहे. यावर तिने ऑक्साईड ज्वेलरी घातली आहे. तिने सगळे केस मागे बांधून त्यामध्ये पांढऱ्या रंगाचाही फुले माळली आहेत. तसेच नोझपिन आणि टिकलीमध्ये ती फारच सुंदर दिसत आहे. तिचे चाहते हे फोटोवर कमेंट करून कौतुकाचे पूल बांधत आहेत.

अमृताची सोशल मीडियावर तगडी फॅन फॉलोविंग आहे. त्यामुळे तिचे कोणतेही फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असतात. त्यात तिच्या या फोटोंनी तर सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे, तिचे अनेक चाहते तिचा हा फोटो शेअर करत आहेत. (marathi actress amruta khanvilkar’s desi saree look viral on social media)

अमृताच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने अनेक मराठी चित्रपटात काम केले आहे. तिने ‘नटरंग’, ‘चोरीचा मामला’, ‘वेलकम जिंदगी’, ‘बाजी’, ‘वेल डन बेबी’ या चित्रपटात काम केले आहे. तसेच तिने ‘जीवलगा’ या लोकप्रिय मालिकेत देखील काम केले आहे. या मालिकेत तिचासोबत स्वप्नील जोशी, सिद्धार्थ चांदेकर आणि मधुरा देशपांडे हे कलाकार होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-आता होणार धमाल! प्रेक्षकांचे मनोरंजन करायला ‘या’ पाच मालिका सज्ज; लवकरच झी मराठीवर मारणार दणक्यात एंट्री

-अथिया शेट्टीच्या पोस्टवर अनुष्काने ‘त्या’ गोष्टीवर निशाणा साधत केली भन्नाट कमेंट

-शिवानी सोनारला वाढदिवसाच्या आधीच मिळाले ‘हे’ गिफ्ट, पाहून तुम्हीही कराल अभिनंदन

हे देखील वाचा