Monday, July 1, 2024

हाय गर्मी! अमृता खानविलकरच्या हॉट फोटोंनी वाढवला सोशल मीडियाचा पारा, एकदा पाहाच

मराठी चित्रपटसृष्टीतील अत्यंत हॉट आणि ग्लॅमरस अभिनेत्रींचा जेव्हा उल्लेख होतो, तेव्हा अभिनेत्री अमृता खानविलकर हिच्या नावाचा समावेश असतो म्हणजे असतोच. अमृता ही विविध गुणसंपन्न अभिनेत्री आहे. तिने चित्रपटात वेगवेगळ्या भूमिका निभावून तिची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सोशल मीडियावर देखील अमृता बऱ्यापैकी सक्रिय असते. तिचे अनेक फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. अशातच तिचे हटके फोटो समोर आले आहेत.

अमृताने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने लाल रंगाचा ड्रेस घातला आहे. तिने लाल रंगाचा टॉप आणि शॉर्ट स्कर्ट घातलेला आहे. तसेच त्यावर जॅकेट घातले आहे. तिने केसांची पोनीटेल बांधली आहे. तसेच पायात पांढरा रंगाचे हाय हील्स घातले आहेत. या लूकमध्ये ती खूपच स्टनिंग दिसत आहे. (Marathi actress amruta Khanvilkar’s hot photos viral on social media)

अमृताने शेअर केलेले हे फोटो तिच्या चाहत्यांना खूप आवडले आहेत. अनेकजण तिच्या या फोटोंवर अनेक प्रतिक्रिया देत आहेत. कोणी तिला “हॉट” म्हणत आहे, तर कोणी “सुंदर” म्हणत आहे. अनेकांना तिचा हा अंदाज खूप आवडला आहे.

अमृताच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने अनेक मराठी चित्रपटात काम केले आहे. तिने ‘नटरंग’, ‘चोरीचा मामला’, ‘वेलकम जिंदगी’, ‘बाजी’, ‘वेल डन बेबी’ या चित्रपटात काम केले आहे. तसेच तिने ‘जीवलगा’ या लोकप्रिय मालिकेत देखील काम केले आहे. या मालिकेत तिचासोबत स्वप्नील जोशी, सिद्धार्थ चांदेकर आणि मधुरा देशपांडे हे कलाकार होते.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जबरदस्त! ऋतिकचे बायसेप्स पाहून चाहते तर सोडाच कलाकारही झाले हँग; टायगरने केली ‘अशी’ कमेंट

-राडाच ना! ‘या’ सेलिब्रेटींचे बाईक कलेक्शन पाहून तुमचेही डोळे होतील पांढरे

-सिद्धार्थ शुक्लाच्या कुटूंबाकडून जारी करण्यात आले निवेदन; मुंबई पोलिसांचे आभार मानत, लोकांना केली ‘ही’ विनंती

हे देखील वाचा