Wednesday, July 3, 2024

लावणी कलाकार मेघा घाडगे हिला नेमकं का केल जातंय ट्रोल? काय आहे प्रकरण, एकदा जाणून घ्याच

प्रसिद्ध लावणी कलाकार आणि मराठी चित्रपट अभिनेत्री मेघा घाडगे ही नेहमी चर्चेत असते. ती ‘बिग बॉस मराठी ४’ या शोमध्ये झळकली होती. मेघाने तिच्या अप्रतिम नृत्यकौशल्याने प्रेक्षकांची मनं जिंकली. तिचा अभिनय आणि नृत्य यामुळे ती कायमच चाहत्यांमध्ये चर्चेत असतेच, पण काही दिवसांपूर्वी गौतमी पाटीलवर जोरदार टीका केल्या ती चर्चेत आली होती. सोशल मीडियावरही अभिनेत्री सक्रिय असते. ती नेहमी आपले फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. परंतु आता ती एका पोस्टमुळे चर्चेत आली आहे.

अभिनेत्री आणि नृत्यांगना मेघ घाडगे हिने नुकतीच शोषल सोशल मिडीयावर एक पोस्ट केली आहे. तिला कपड्यांवरून ट्रोलिंग केल्यामुळे तिने तिखट शब्दात उत्तर दिले आहे.

तिने या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “मी माझ्या वैयक्तिक आयुष्यात कोणते आणि कसे कपडे घालायचे याचा सर्वस्वी अधिकार आणि सामाजिक भान मला आहे आणि बहुतेक हे सर्वांनांच असत. नाही का ?? जिथे बोलायला आणि कमेंट करायला हवी तिथे मात्र तोंड आणि बुद्धी जाणूनं बुजून बंद ठेवता तेव्हा तुमचे संस्कार पाणी त्यायला जातात. मी माझी रंगमंचावरील जबादारी कोणतही राजकारण न करता चोख पार पाडते . तिथे मला बंधन आहेत . पण माझ्या खाजगी आयुष्यात डोकवायला आणि बोलायला कोणालाही मी अधिकार दिलेले नाहीत . तर कृपया जगा आणि जगुद्यात.”

Megha Ghadge

तिने केलेल्याया या पोस्ट वर नेटकऱ्यांनी तिला पाठींबा दिला आहे. एका चाहत्याने पाठींबा देत कमेंट केली की, ‘सेलिब्रिटीजना हे अटळ असतं. दुर्लक्ष करून पुढे जाणं हेच उत्तम. आपला समाज अजून तितका परिपक्व नाही झाला अजून आणि पुढेही फार अपेक्षा नाहीत.’

मेघाने या पोस्ट मध्ये लावणीच्या कार्यक्रमातील फोटो शेअर केला आहे. आणि त्या बरोबरच एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे.  या व्हिडीओमध्ये तीने एका पुरस्कार सोहळ्यात हजेरी लावली होती तेव्हाचा आहे. (marathi actress and lavani dancer megha ghadge troll her dress viral post)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘सात समुंदर पार…’ गाण्यावर अनन्यासह थिरकले चंकी पांडे, बापलेकीची भन्नाट जाेडी एकदा पाहाच
स्वरा भास्करचे बहुमोल मंगळसूत्र का आहे चर्चेत? ‘या’ संस्कृतीशी आहे विशेष संबंध

हे देखील वाचा