Monday, February 24, 2025
Home मराठी ‘अगं किती गोड’, म्हणत ‘राधिका’च्या सौंदर्यावर भुलली ‘ही’ अभिनेत्री

‘अगं किती गोड’, म्हणत ‘राधिका’च्या सौंदर्यावर भुलली ‘ही’ अभिनेत्री

‘मी कुटू राहिले माझ्या नवऱ्याची बायको’, हा डायलॉग आठवतोय का? काय एवढ्यात विसरलात? कसे विसराल बरं? हाच डायलॉग म्हणत राधिकाने पाच वर्षे प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. राधिका म्हणजेच आपल्या सर्वांची लाडकी अभिनेत्री अनिता दाते होय. ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतून तिने महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या मनावर राज्य केले आहे.

एका गृहिणीपासून ते एक यशस्वी आणि जबाबदार व्यावसायिक बनून तिने प्रत्येक सामान्य स्त्रीमधील एका असामान्य शक्तीची जाणीव करून दिली होती. तिच्या मालिकेने जरी निरोप घेतला असला, तरीही ती सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी आजही जोडून आहे. ती अनेकवेळा तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. अशातच तिचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. (Marathi actress Anita date’s beautiful photos viral on social media)

अनिताने नुकताच तिचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. या फोटोंमध्ये तुम्ही पाहू शकता की, अनिताने हिरव्या रंगाची प्लेन साडी घातली आहे. यावर तिने पिवळ्या रंगाचा ब्लाऊज घातला आहे. यासोबत कानात मोठे इअरिंग घातले आहे. तिने कपाळी हिरव्या रंगाची छोटीशी टिकली लावली आहे. ज्यामध्ये तिचे रूप आणखीनच खुलले आहे.

तिचा हा फोटो तिच्या चाहत्यांना तसेच अनेक कलाकारांना खूप आवडत आहे. अनेकजण या फोटोवर कमेंट करत आहेत. तिच्या या फोटोवर अभिजीत खांडकेकरने फायर ईमोजी पोस्ट केली आहे. आदिती द्रविड हिने “वाव,” अशी कमेंट केली आहे. अभिनेता सुयश टिळकने हार्ट ईमोजी पोस्ट केली आहे, तर किशोरी आंबिये हिने “गं किती गोड,” अशी कमेंट केली आहे. तसेच तिचे अनेक चाहते देखील या फोटोवर सातत्याने प्रतिक्रिया देत आहेत.

अनिता दाते हिच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने अनेक मराठी चित्रपटात काम केले आहे. तिने ‘जोगवा’, ‘तुंबाड’, ‘सनई चौघडे’, ‘पोपट’, ‘अय्या’, ‘द स्मेल’, ‘कॉफी आणि बरंच काही’ या चित्रपटात काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अबब! मौनी रॉयने बिकिनीमध्ये केला इंटरनेटवर कहर, बोल्ड अंदाज पाहून चाहतेही झाले हैराण

-Bigg Boss OTT: शोवर भडकली माजी स्पर्धक सोफिया हयात; म्हणाली ‘करण जोहर सलमान खानपेक्षाही वाईट…’

-जेव्हा शाहरुख खानला महिला चाहती म्हणाली होती, ‘आय लव्ह यू अक्षय’; रंजक आहे ‘तो’ किस्सा

हे देखील वाचा