Monday, February 24, 2025
Home मराठी सगळ्यांच्याच लाडक्या राधिकाचा ‘हा’ हटके लूक पाहून सर्वजणं म्हणताय, ‘हा बदल नक्कीच स्वागताहार्य’

सगळ्यांच्याच लाडक्या राधिकाचा ‘हा’ हटके लूक पाहून सर्वजणं म्हणताय, ‘हा बदल नक्कीच स्वागताहार्य’

‘मी कुटू राहिले माझ्या नवऱ्याची बायको’ काय एवढ्यात विसरलात काय हा डायलॉग? कसे विसराल? हाचं डायलॉग म्हणून राधिकाने पाच वर्ष प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. राधिका म्हणजेच आपल्या सर्वांची लाडकी अभिनेत्री अनिता दाते. ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतून तिने महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या मनावर राज्य केले आहे.

एका गृहिणीपासून ते एक यशस्वी आणि जबाबदार व्यावसायिका बनून तिने प्रत्येक सामान्य स्त्रीला तिच्यात असणाऱ्या एका असामान्य शक्तीची जाणीव करून दिली होती. तिच्या मालिकेने जरी निरोप घेतला असला तरीही ती सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी आजही जोडून आहे. ती अनेकवेळा तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. अशातच तिचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. ( Marathi actress Anita date’s photos viral on social media)

अनिताने अलीकडेच सोशल मीडियावर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती जिन्स आणि पांढऱ्या रंगाच्या शर्टमध्ये दिसत असून, फोटोमध्ये तिने सगळे केस मागे बांधले आहे. यात ती खूपच वेगळी परंतु सुंदर आणि आकर्षक दिसत आहे.

तिच्या या फोटोवर अनेकांच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. तिच्या चाहत्यांना तसेच अनेक कलाकारांना देखील तिचा हा लूक खूप आवडला आहे. या फोटोवर अभिजित खांडकेकर, नंदिता पाटकर, ईशा केसकर, मृण्मयी गोडबोले यांनी कमेंट करून तिच्या या लूकचे कौतुक केले आहे.

अनिता दाते हिच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने अनेक मराठी चित्रपटात काम केले आहे. तिने ‘जोगवा’, ‘तुंबाड’, ‘सनई चौघडे’, ‘पोपट’, ‘अय्या’, ‘द स्मेल’, ‘कॉफी आणि बरंच काही’ या चित्रपटात काम केले आहे.

 

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अंमली पदार्थ प्रकरणात आर्यन खानला अटक, किंग खानला भेटण्यासाठी भाईजान पोहोचला ‘मन्नत’ला

-दिशा पटानीने शेअर केला तिचा ‘असा’ दिलकश फोटो, अदा पाहून स्वत:ला रोखू शकला नाही टायगर श्रॉफ

-तेजस्विनी पंडितने सोशल मीडियावर शेअर केले तिचे वेगवेगळे मूड, फोटो पाहून स्वप्नील जोशी म्हणतोय…

हे देखील वाचा